One Rupee crop insurance : राज्य सरकारच्या (State Government) 1 रुपयात पीक विमा योजनेला एतिहासिक प्रतिसाद मिळाला असून, देशात सर्वाधीक पीक विमा योजनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
फायद्याची माहिती : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सीड पार्क उभारणार : कृषीमंत्री धनंजय मुंडे
आतापर्यंत एक कोटी 50 लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेतला असल्याचे सांगून कृषीमंत्री (Agriculture Minister) मुंडे म्हणाले, अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना पिक विमा भरता यावा यासाठी राज्य सरकारने त्यांचा प्रीमियम भरण्याची जबाबदारी घेतली आहे. अजून 3 दिवस बाकी आहेत, यापेक्षाही अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मराठवाड्यातल्या काही भागात अद्याप देखील जोरदार पाऊस झालेला नाही. त्यातच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), बीड (Beed), जालना (Jalna) या जिल्ह्यात अजूनही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आशा आहे.
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ज्या भागामध्ये फळबाग (Fruit Orchard) उत्पादक शेतकऱ्यांचे पावसाअभावी नुकसान होईल, त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कृषी विभागाच्या वतीने त्यांना योग्य ती मदत देण्यात येणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.
गुडन्यूज : पीक विमा भरण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ
https://www.facebook.com/shetimitramagazine03