राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या वतीने पुरंदर येथे मध पोळे चाचणी प्रयोगशाळा नुकतीच सुरु करण्यात आली आहे. येथील स्वाती एंटरप्रायझेसने ही लॅब सुरु केली असून, आता येथे एफएसएसएआय, बीआयएस आणि अॅगमार्क मानकांनुसार मध आणि इतर मधमाशी उत्पादनांच्या सर्व प्रतिजैविक, कीटकनाशके, जड धातू, भेसळ अशा बाबी तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
राष्ट्रीय मधमाशीपालन आणि मध अभियान या केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यातून साकार झालेल्या योजना त्यासाठी जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रासह 5 राज्यांमधील 7 मधचाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रयोगशाळेचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने नुकतेच झाले आहे.
हे वाचा : शेतकऱ्यांना टोमॅटोची लॉटरी : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
पुरंदर येथील या मध पोळे चाचणी प्रयोगशाळेत मध आणि इतर मधमाशी उत्पादनांची चाचणी घेण्यासाठी सर्व प्रगत प्रकारची यंत्रसामग्री आणि तंत्रे या प्रयोगशाळेत उपलब्ध आहेत. पुण्यासह इतर जिल्ह्यांतील मधमाशीपालकांनाही या लॅबचा लाभ मिळणार आहे. यामुळे चाचणीचा खर्च कमी होईल, तसेच चाचणीचा वेळही वाचणार आहे. मधमाशीपालक त्यांचे नमुने या प्रयोगशाळेत २४ तास पाठवू शकणार आहेत. त्यामुळे त्यांचा कुरिअर खर्च कमी होणार आहे.
मोठी बातमी : नाफेड हमीभाव खरेदी केंद्रावरील हरभरा खरेदी अचानकपणे थांबवली
पुण्यातील स्वाती एंटरप्रायझेस आपल्या तज्ज्ञांद्वारे नैसर्गिक मध आणि इतर मधमाशी उत्पादने तयार करते. संपूर्ण भारतातील मधमाश्या पाळणारे आणि ते इतरांकडून मधदेखील घेतात. परंतु सुसज्ज प्रयोगशाळेच्या अभावी ते त्यांची मधमाशी उत्पादने राज्याबाहेर किंवा देशाबाहेर चाचणीसाठी पाठवावी लागत होती. मध आणि इतर मधमाशी उत्पादनांची गुणवत्ता राखण्यासाठी, सुसज्ज मध चाचणी प्रयोगशाळांची उपलब्धता ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये ही बाब लक्षात घेऊन, एनबीबीने एनबीएचएमअंतर्गत बाहेर पडणाऱ्या लॅबच्या विकासाद्वारे, बळकटीकरणाद्वारे आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी शंभर मिनी मध चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याची तरतूद केली. या लहान उपग्रह मधचाचणी प्रयोगशाळा उपग्रह केंद्राप्रमाणे काम करणार असून मोठ्या प्रादेशिक मधचाचणी प्रयोगशाळेशी संपर्कात राहून काम करणार आहे.
आनंदाची बातमी : डाळिंबावरील खोडभुंगेऱ्यावर लवकरच नव्या शिफारशी
सध्या पुण्यासह इतर कोणत्याही जिल्ह्यात एफएसएसएआय मानकांच्या निर्देशानुसार मध आणि इतर मूल्यवर्धित मधमाशी उत्पादनांच्या सर्व बाबींची चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध नाही. त्यामुळे मधमाशीपालक त्यांचे मध आणि मधमाशी उत्पादने आंतरराज्यात, परदेशात त्यांच्या उत्पादनाची चाचणी घेण्यासाठी पाठवतात. यामध्ये वेळ आणि वाढता आर्थिक खर्च ही मुख्य अडचण लक्षात घेऊन मधमाशीपालन करणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही प्रयोगशाळा स्थापन केली आहे.
नक्की वाचा : शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनांचा दर्जा व वेगळेपणा जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1