शुक्रवारी 29 जुलै पासून श्रावण महिना सुरु होणार आहे. श्रावण सुरु होण्याच्या एक दिवस अधि सर्वत्र गटारी अमावस्या साजरी केली जाते. यावर्षी गटारी अमावस्या 28 जुलै रोजी आहे. गटारी म्हणजे मांसाहार आणि मदिरापान अर्थात दारू पिणे असाच समज झाला आहे. पण तसे नाही ; आपल्या सणांना बदनाम करण्यासाठी इंग्रजांच्या काळात गटारी अमावस्या हे नाव रूढ झाले आहे.
मुळात गटर हा इंग्रजी शब्द आहे. अशुध्द जलसंवहन यंत्रणेसाठीचा हा इंग्रजी प्रतिशब्द आहे. इंग्रजांच्या काळात या शब्दाशी भारताचा परिचय झाला. भारतीय सण हे नेहमीच पावित्र्याचं अधिष्ठान असलेले आहेत. तसेच स्थल काल व परिस्थिती यांच्याशी त्यांचा प्रगाढ संबंध आहे. आषाढ हा पूर्वी विशेष करुन तीव्र वर्षावाचा कालावधी असे. पावसामुळे अंधारलेपण व अन्न अनुपलब्धता हा मोठा अडचणीचा काळ असे. आपल्या कडे आषाढी अमावस्या नंतर आहारात बदल केला जातो.
फायद्याच्या टिप्स : मका पिकावर लष्करी अळीचा हल्लाबोल !
या दिवसाला गताहारी (जो आहार गेला आहे ती) अमावस्या म्हणतात. ऊपोषण म्हणजे गताहार. तर गत म्हणजे गेलेला आहार म्हणजे जेवण. तर असा हा गताहार प्रारंभ आषाढी अमावस्येपासून होतो. म्हणून गताहारी अमावस्या असे म्हटले जाते. विशेषत: आपल्या प्रत्येक सणांचे नावे संस्कृतवर आधारित आहेत. गटर हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळ पणे जोडलेला आहे.
श्रावण महिणा लागण्याआधीच मासांहारी लोक गटारी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गटारीच्या दिवशी, लोक जवळचे मित्र आणि प्रियजनांसह स्वादिष्ट मांसाहारी पदार्थाचा आस्वाद घेतात कारण श्रावण सुरु झाल्यानंतर चिकन मटण खाणे चुकीचे मानले जाते.
लक्षवेधी बातमी : 24 दिवसांच्या काळात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या !
श्रावण महिन्यात दारू, मांसाहार या गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. म्हणजेच श्रावण महिन्यात आपण यातील काहीही खात नाही. थोडक्यात काय, तर हा आहार गेलेला असतो. म्हणून श्रावण सुरु होण्याच्या आधीची म्हणजेच आषाढाची अमावस्या गताहारी, साजरी केली जाते आणि पुढच्या महिन्याभरात जे जेवण त्यागायचं आहे, ते भोजन यादिवशी केलं जातं.
श्रावण महिणा लागण्याआधीच मासांहारी लोक गटारी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गटारीच्या दिवशी, लोक जवळचे मित्र आणि प्रियजनांसह स्वादिष्ट मांसाहारी पदार्थाचा आस्वाद घेतात कारण श्रावण सुरु झाल्यानंतर चिकन मटण खाणे चुकीचे मानले जाते. कारण पावसाळ्यात येणाऱ्या श्रावण महिन्यात आजारांचा धोका जास्त असतो. त्यामुळे लोक हलके अन्न खाण्यास प्राधान्य देतात.
आनंदाची बातमी : नाथसागर 90 टक्के भरले
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1