जाणून घ्या ! फळे, फळभाज्या व भाजीपाला उत्पादनाचे विक्री व्यवस्थापन तंत्र
शेतकरी असंख्य अडचणींवर मात करत उत्कृष्ट फळे, फळभाज्या व भाजीपाला यांचे उत्पादन करतो. परंतु त्यांना बाजार पेठेत योग्य दर मिळत नाही. फळे, फळभाज्या व भाज्या नाशवंत असल्या कारणाने काढणी पश्च्यात त्यांची लवकरात लवकर विक्री होणे आवश्यक असते.
फळांची उत्पादन करणे हे शेतकऱ्यांच्या हातात असते परंतु बाजार पेठेत योग्य बाजार भाव मिळणे हे त्याच्या हातात नसते. आपला शेतमाल बाजार पेठेत कुठल्या बाजारभावाने विकेल याची त्यास पूर्वकल्पना नसते त्यामुळे शेतकऱ्याला बाजारपेठेची विस्तृत माहिती मिळणे गरजेचे आहे.
फळे, फळभाज्या व भाजीपाला उत्पादकांची प्रगतशील भरभराट अथवा फायदाहा केवळ किती उत्पन्न झाले, यावर अवलंबून नसून उत्पादनाच्या यशस्वी विक्रीवर सुध्दा ठरवले जाते. जोपर्यंत ग्राहकांपर्यंत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल हा कमीतकमी मध्यस्थांच्या साखळीतून योग्य दरात पोहचत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न असफल आहेत.
अलीकडच्या यांत्रिक युगामुळे, आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे आणि दळणवळणाच्या प्रगत साधनांमुळे जग हे लहान होत चालले आहे. तसेच फळे, फळभाज्या व भाजीपाला यांच्या नाशवंतपणामुळे त्यांच्या उत्पादनाच्या विक्री व्यवस्थापनास अनन्य साधारण महत्त्व आहे.
फळे, फळभाज्या आणि भाजीपाला यांच्या विक्री व्यवस्थापनामध्ये त्यांच्या काढणीपासून ते त्यांची विक्री करेपर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश होतो. काढणीनंतर त्यांच्या अंतर्गत रचनेमुळे व बाह्यकारणांमुळे ती लगेच खराब होऊ लागतात. काहीफळे उदाहरणार्थ डाळिंब, कवट, लिंबूवर्गीय फळे काही दिवस टिकून राहतात. तर जांभुळ, स्ट्रॉबेरी, फालसा फळे तसेच काही भाजीपाला यांच्यात तजेलदारपणा रहात नाही. काढणीपश्चात काहीतासातच ती सुकू लागतात. त्यामुळे अशा फळे, फळ भाज्या व भाजीपाला यांना बाजारभाव हा कमी मिळतो म्हणून त्यांची काढणी केल्या बरोबरच लवकरात लवकर बाजारात पोहचवणे गरजेचे असते.
फळे, फळभाज्या आणि भाजीपाला उत्पादनापासून ते ग्राहकांच्या हातात पोहचेपर्यंत ३० ते ४० टक्के उत्पादनाची नासाडी होते. फळांच्या प्रकारानुसार त्यांची परिपक्वता अवलंबून असते. भाजीपाला खाणेयोग्य पक्वतेचा असताना त्याची काढणीही काळजीपूर्वक करावी. किडलेली, खरचटलेली, दबलेली फळे व भाज्या वेगळ्या कराव्यात त्यानंतर चांगल्या मालातून आकारमान, रंग, वजन, जाती, आकर्षकपणा आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन त्यांची वेगवेगळी प्रतवारी केली जाते. परकीय बाजारपेठेत विक्रीसाठी तसेच देशांतर्गत दुरच्या बाजार पेठांसाठी प्रथमदर्जाचा व चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल पाठवीला जातो त्यांच्या वाहतुकीत पॅकेजिंग विशेष लक्षपुरविणे आवश्यक आहे. अन्यथा वाहतुकीत त्यांची फार मोठी नासाडी होते.
भारतात एकूण फळे, फळभाज्या आणि भाजीपाल्याच्या उत्पादनाच्या ९२ टक्के मालाचीही वाहतूक रस्त्याने केली जाते व ८ टक्के मालाची वाहतूक रेल्वेनी होते. रेल्वेने होणारी वाहतूक ही रस्त्याच्या वाहतुकीपेक्षा ८ ते १० पटीने कार्यक्षम असली तरी रस्त्यावरील वाहतुकीमुळे माल घरोघरी पोहोचविणे सहज शक्य होते. मध्यपूर्वेकडील देशात शेतमाल पाठवताना सागरी मार्गाचा अवलंब केला जातो. तसेच काही ठिकाणी विमानांचा वापरदेखील केला जातो. फळांची वाहतूक करताना किंवा त्यांची चढउतार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. जर अत्यंत घाईगडबडीत वाहतूक केल्यास फळमाल एकमेकांना घासली जाऊन फळांवर डाग पडतात. अशा डागपडलेल्या फळांना बाजारात मागणी नसते. तसेच भाजीपाल्याची सुद्धा योग्य पॅकिंग करून वाहतुकीकडे बारीक लक्ष पुरविली जाते. जेणे करून नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
शेतकरी आर्थिक व हवामान विषयक अशा असंख्य अडचणींवर मात करत उत्कृष्ट फळे, फळभाज्या व भाजीपाला यांचे उत्पादन करतो. परंतु त्यांना बाजार पेठेत योग्य दर मिळत नसल्या कारणाने त्यांची प्रचंड नुकसान झाल्यामुळें त्यास खूप मानसिक त्रास होत असतो. फळे, फळभाज्या व भाज्या नाशवंत असल्या कारणाने काढणी पश्च्यात त्यांची लवकरात लवकर विक्री करणे अति आवश्यक असते. फळांची उत्पादन करणे हे शेतकऱ्यांच्या हातात असते परंतु बाजार पेठेत योग्य बाजार भाव मिळणे हे त्याच्या हातात नसते. आपला शेतमाल बाजार पेठेत कुठल्या बाजारभावाने विकेल याची त्यास पूर्वकल्पना नसते त्यामुळे शेतकऱ्याला बाजारपेठेची विस्तृत माहिती मिळणे गरजेचे आहे.
फळांची, फळभाज्यांची व भाज्यांची आवक बाजार पेठेत कधी व केव्हा असते, कोणत्या फळाला जास्त मागणी कधी असते या सर्व बाबीवर शेतकऱ्याने बारीक लक्ष ठेवाणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाच्या उत्पादनांची त्यानुसार विक्री व्यवस्था करावी. अचानक झालेली जास्त शेतमालाची आवक यामुळे बाजारभाव अचानक घसरतात आणि त्यामुळे शेतकऱ्याला आपला शेतमाल मिळेल त्या भावाने विक्री करावी लागते. याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग त्यांच्याकडे नसतो म्हणून तर बाजार पेठांचा व विक्री व्यवस्थेचा परिस्थिती नुसार अभ्यास करणे ही एककाळाची गरज झाली आहे.
फळे, फळभाज्या आणि भाजीपाला यांच्या विक्री व्यवस्थेत शक्यतो शेतकरी कधी स्वतःविक्री करत नाही, त्यांच्या विक्रीमध्ये शेतकरी स्थानिक व्यापारी, घाऊक व्यापारी, दलाल, अडते आणि सहकारी संस्था इत्यादींचा सहभाग असतो. सर्व साधारणपणे शेतमालाच्या किंमतीत बराचसा वाटा हा दलाल किंवा अडत्या खातो व शेतकऱ्यांची त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. पण शासनाने त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करून मालाच्या उघड लिलाव पद्धतीचा अवलंब केला आहे.
अलीकडे सहकारी तत्त्वावर फळे, फळभाज्या आणि भाजीपाला विक्रीच्या विविध संस्था स्थापन करून फळांची विक्री व निर्यात करण्यास सुरुवात झाली आहे. त्यास सरकार प्रोत्साहन व विविध योजनांद्वारे सबसिडी देत आहे. उच्चदर्जाची व चांगली गुणवत्तेची फळे, फळभाज्या आणि भाजीपाला यांची निर्यात केली हाते. आपल्या शेतमालाला अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी असते भारतातून डाळिंब, द्राक्ष, आंबा इत्यादी फळे व कांदा, बटाटे, ढोबळी मिरची, वांगी, भेंडी इत्यादी भाज्यांची निर्यात केली जाते.
डॉ. संदीप मोरे, सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, आदित्य कृषी महाविद्यालय, बीड-४३११२२ (मोबा. ९२८४१९२१८८)
डॉ. बी. सी. वाळुंजकर, आर. आर. लिपने, सहाय्यक प्राध्यापक, कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, सोनाई. (मोबा. ९७६७०८५६६३)
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा