सध्या फळवर्गीय भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. भेंडी ही लहानापासून मोठ्यापर्यंत आवडीने खाल्ली जाणारी भाजी आहे. त्यामुळे बारमाही भेंडीला चांगली मागणी असते. भेंडी ही फळभाजी शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळवून देणारे अल्पावधीतील पीक आहे. असे असले तरी भेंडी उत्पादन तसे जिकिरीचे काम आहे. कारण भेंडीवर पडणार्या रोगांचे नियंत्रक करण्यासाठी त्याची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे असते.
फायद्याची माहिती : भेंडीवरील किडींचे असे करा एकात्मिक व्यवस्थापन
यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाड कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्पातील माजी प्राध्यापक डॉ. पी. ए. ठोंबरे यांनी सांगितलेल्या काही टिप्स् पाहू !
1) हळद्या रोग (पिवळा मोझॅक) हा भेंडीवर उद्भवणाऱ्या विविध रोगापैकी हळद्या हा विषाणुजन्य मोठा भातुक रोग आहे. रोपे लहान असताना हा रोग आल्यास पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हा रोग येलो व्हेन मोझॅक व्हायरस या विषाणूमुळे होतो.
रोगाच्या सुरूवातीला पानांच्या शिराजवळील भाग पिवळा पडतो. कालांतराने पानांच्या सर्व शिरा पिवळ्या पडतात आणि जाड होतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पाने पिवळी होतात. रोग फुलोऱ्याच्या पूर्वी आल्यास झाडाची वाढ खुंटते फळे आकाराने लहान, पिवळी आणि वाकडी-तिकडी होतात. अशा रोगट फळांना बाजारात भाव मिळत नसल्यामुळे आर्थिक नुकसान होते.
महत्त्वाची माहिती : कसे मिळवाल ? उन्हाळी गवारीचे २० तोडे
हळद्या या रोगाचा प्रसार पांढरी माशी या किडीद्वारे होतो. रोग निवारण्यासाठी पिकाच्या सुरूवातीलाच फोरेट या दाणेदार किटकनाशकाचा प्रती हेक्टरी दहा किलो या प्रमाणात जमिनीत वापरावे. रोपे उगवून आल्यावर हे किटकनाशक रोपाभोवती मातीत मिसळावे. तसेच झाडावर फळधारणा होण्यापूर्वी बारा ते पंधरा दिवसांच्या अंतराने योग्य आंतरप्रवाही किटकनाशकाची फवारणी करावी.
रोपे लहान असताना रोगाची लागण झाल्यास रोगट रोपे उपटून नष्ट करावीत. पिकाखालील जमीन तणविरहीत ठेवावी. प्रतिकारक्षम जातीची लागवडीसाठी निवड करावी. परभणी क्रांती, अर्का अभय, अर्का अनामिका, पी-7 फुले किर्ती या जाती हळव्या रोगास प्रतिकारक्षम असून उत्पादनातही सरस आहेत.
महत्त्वाच्या टिप्स : भाजीपाल्यासाठी महत्त्वाच्या 4 टिप्स्
2) भुरी हा बुरशीजन्य रोग कोरड्या हवामानात पिकाच्या वाढीच्या कुठल्याही अवस्थेत येऊ शकतो. या रोगाची लागण सुरूवातीस पानावर पांढरट रंगाच्या चट्ट्यांच्या स्वरूपात आढळते. अनुकूल वातावरणात सर्व चट्टे एकमेकांत मिसळून संपूर्ण पान पांढरट भुरकट होते. याच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक 30 ग्रॅम किंवा पाच मिली पेन कोनॅझोल किंवा ट्रायडेमार्क किंवा कॅराथेन दहा लिटर पाण्यात मिसळून रोगाची लक्षणे दिसताच फवारणी करावी किंवा 300 मेश गंधकाची दहा किलो प्रती हेक्टरी या प्रमाणात वारा शांत असताना धुरळणी करावी.
फायद्याची माहिती : काकडीचे असे करा पीक संरक्षण
एकात्मिक व्यवस्थापन : उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीतील रोग व किडींच्या सुप्तावस्था उन्हामुळे व पक्षी खावून नष्ट होतील. तणांचे नियंत्रण करावे. भेंडीची वेळेवर लागवड करावी व खताची योग्य मात्र वापरावी. नत्राचा अतिरिक्त वापर करू नये. पिकाची फेरपालट करावी. लागवडीपुर्वी बियाण्यास ७० टक्के थायोमिथॉक्झॉंम / इमिडाक्लोप्रीड ५ ग्रॅम प्रति किलो या प्रमणात बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. किडग्रस्त भेंडी तोडून अळीसहीत नष्ट करावीत.
(संदर्भ : शेतीमित्र मासिक)
महत्त्वाच्या टिप्स : वांगी पिकाचे असे करा एकात्मिक कीड नियंत्रण
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1