भारतीय हवामान विभागाकडून यंदा प्रथमच पावसाळ्यात प्रत्येक महिन्यात हवामानाचा अंदाज जारी करण्यात येत आहे. हवामान विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. महापात्रा यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे.
पावसाळ्याच्या या कालावधीमध्ये मान्सूनचा पाऊस सरासरी इतका राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील ऑगस्ट महिन्यात सरासरी इतका पाऊस होऊ शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशात पाऊस सरासरी इतका कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात या काळात सरासरीच्या 95 ते 105 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महन्यात देशात सर्वत्र पाऊस पडेल असाही अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सप्टेंबर महिन्यासाठीचा स्वतंत्र अहवाल जारी केला जाईल, असं सांगण्यात आलं आहे.
भारतीय हवामान विभागनं जारी केलेल्या अंदाजानुसार मध्य भारत आणि दख्खनच्या पठारावर सरासरीच्या सामान्य पाऊस होऊ शकतो. यानुसार महाराष्ट्रात देखील ऑगस्ट महिन्यात सरासरी इतका पाऊस होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यातही महाराष्ट्रात सरासरीच्या सामान्य स्थिती इतका पाऊस होणार आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा