Tomato Price Boom : गेल्या काही महिन्यांपासून बाजारात टोमॅटोचे दर तेजीत असून, ज्यांच्याकडे टोमॅटो होते अशा शेतकऱ्यांना यंदा चांगले पैसे मिळत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये टोमॅटोची आवक वाढून भाव 30 रुपयांपेक्षा कमी होतील, असा अंदाज सरकारसह काही संस्थांनी व्यक्त केला आहे. मात्र हे शक्य नसल्याचे कृषी अभ्यासकांचे मत आहे.
नक्की वाचा : 8 राज्यातील 4.09 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली
दरम्यान, येत्या काही दिवसांत टोमॅटोचे दर (Tomato Prices) आणखी वाढण्याची शक्यता असून ते 300 रुपये किलोच्या पुढे जातील असे मत दिल्ली येथील टोमॅटो असोसिएशनचे (Tomato Association) अध्यक्ष आणि एपीएमसीचे सदस्य अशोक कौशिक यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रासह बहुतांश राज्यात जुलै महिन्यात टोमॅटोच्या लागवडी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील टोमॅटोच्या लागवडीत यंदा 50 टक्के घट झाली आहे. पुढचे किमान दोन महिने तरी नवीन टोमॅटो (Fresh Tomatoes) बाजारात येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे किरकोळ विक्रीचे दर चढेच राहतील, ते तातडीने 30 रुपये किलोवर येणारच नाहीत, असेही व्यापाऱ्यांकडून बोलले जात आहे.
मोठी बातमी : हळदीचे भाव महिन्यात दुप्पट : भाव आणखी वाढणार
यंदा मॉन्सूनच्या पावसाचे वितरण हे विचित्र पद्धतीने झाले. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत उत्तर भारतामध्ये मुसळधार, तर दक्षिण भारत कोरडा अशा पद्धतीचे चित्र होते. यामुळे उत्तरेकडील राज्यांतील टोमॅटोच्या पिकाला (Tomato Crop) अतिवृष्टीचा (Heavy Rain) फटका बसला, तर दक्षिणेकडे लागवड करण्यास उशीर झाला.
मे महिन्यात 15 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो 250 ते 280 रुपये किलोपर्यंत गेला. त्यामुळे सरकार टोमॅटो उत्पादक (Tomato Growers) राज्यातून टोमॅटो खरेदी करून शहरातील ग्राहकांना (Urban Consumers) कमी किमतीमध्ये विक्री करत आहे. या खरेदी-विक्रीमध्ये होणारा तोटा सरकार आपल्या खिशातून भरत आहे. टोमॅटोसाठी किमान आधारभूत किंमत नसल्याने आता ठरावीक पातळीच्या खाली दर गेल्यानंतर सरकारने (Government Policy) शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर मदत करण्याची मागणी होत आहे.
महत्त्वाची माहिती : गोगलगाय नियंत्रणासाठी या करा उपाययोजना : कृषी विभागाचा सल्ला
सध्या बाजारात टोमॅटोला (Tomato Market) आजही 70 ते 90 रुपये प्रतिकिलोचा भाव असून, किरकोळ विक्री 130 ते 150 रुपयांपर्यंत सुरु आहे. मुंबई (Mumbai), दिल्ली (Dhili) सारख्या शहरांमध्ये टोमॅटोचे भाव 220 रुपये किलोवर पोहोचले आहेत.
दरम्यान, जुलै महिन्यातील टोमॅटो लागवडी (Tomatoes Planting) वाढल्या असल्या तरी जुलै महिन्यात सलग तीन आठवडे अनेक टोमॅटो उत्पादक पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे टोमॅटोची गुणवत्ता कमी झाली आहे. टोमॅटोवर डाग पडले आहेत. अनेक भागात टोमॅटो (Tomato) पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागांमध्ये टोमॅटो पिकसह (Tomato Crop) टोमॅटो रोपांनाही (Tomato Seedlings) फटका बसला आहे. नवीन टोमॅटो बाजारात येण्यास अजून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी आहे. त्यानंतरच टोमॅटोचे दर कमी होतील असे बोलले जात आहे.
मोठी घोषणा : बाजार समितीतील शेतमाल विक्रीचे पैसे 24 तासामध्ये द्या अन्यथा करवाई : मंत्री अब्दुल सत्तार

https://www.facebook.com/shetimitramagazine03