लवकरच देशात एचटीबीटी या जातीच्या कापूस लागवडीला परवानगी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन बीटीच्या दुप्पट होणार असून, या जातीच्या कापूस उत्पादनाची चाचणी घेण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. या नवीन वाणामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर या कापसाच्या उत्पादनास कुठलीच हरकात नसल्याचे सांगितले जात आहे.
या कापसाच्या उत्पादणासाठी टेक्सटाईल इंडस्ट्री, खाजगी कंपन्या, तसेच संचालक मंडळी सकारात्मक आहेत, यामुळे लवकरच देशात एचटीबीटी कॉटन उत्पादीत केला जाऊ शकतो असे जाणकार लोक सांगत आहेत. देशातील अनेक पर्यावरण प्रेमी या कापसाच्या उत्पादणामुळे पर्यावरणाचा व जैवविविधतेचा ऱ्हास होईल असा युक्तिवाद करत या कापसाच्या उत्पादनाला विरोध करत आहेत मात्र सध्या कापूस उत्पादक शेतकरी मजूर टंचाई, तणनियंत्रण आणि उत्पादनातील घट यामुळे समस्येमुळे अडचणीत येत आहे. खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे कापसाच्या या नव्या वाणामुळे उत्पादन वाढणार असेल तर कापूस उत्पादकांना त्याचा फायदाच होणार आहे. त्यामुळे सरकारनेच एचटीबीटी कापूस उत्पादनाला मान्याता द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातूनही होत आहे. पर्यावरण प्रेमी आणि कापूस उत्पादक शेतकर्यांचा युक्तिवाद लक्षात घेता केंद्र सरकार कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री माननीय पियुष गोयल जी यांनी मोठी सकारात्मकता दर्शवली आहे.

देशात बीटी कापसाचा इतिहास जवळपास दोन दशकापूर्वीचा आहे. आज देशातील 110 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 95 टक्के बीटी कापूस लागवड केली जाते. बीटी 1 आणि बीटी 2 नंतर आता बीटी 3 अर्थात एचटीबीटी तंत्रज्ञान मॉन्सन्टो कंपनीकडे तयार आहे. मॉन्सन्टो कंपनीने bt3 कापसासाठी मध्यंतरी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती मात्र त्यावेळी सरकारने यासाठी हरकत दाखवली होती. मॉन्सन्टो कंपनी आता प्रमुख औषध निर्माती कंपनी म्हणून ओळखली जाणारे बायर कंपनीने खरेदी केली आहे, बायर कंपनीने bt3 कापसासाठी सरकारला आता पुन्हा एकदा प्रस्ताव पाठविला आहे मात्र आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने यासंदर्भात अनुकूलता दर्शविली आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
या कारणामुळे ढासळणार कांद्याचे दर !
नुकसानभरपाईचा 773 कोटी रुपयांचा निधी मराठवाड्यासाठी वितरित
असे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी धोरण
येत्या दोन वर्षात 31 जिल्ह्यात उभारणार 14 हजार कांदाचाळी
खरेदी केंद्रे सुरू आता हरभऱ्याला मिळणार हमीभाव
दोन दशकांपूर्वी कापसाचे उत्पादन हेक्टरी 179 किलो एवढेच होते मात्र बीटी 1 कापसाची देशात इंट्री झाल्यानंतर कापसाचे हेक्टरी 400 किलो उत्पादन झाले. बीटी 2 कापसाची इंटर झाल्यानंतर हे उत्पादन चारशे पन्नास किलो हेक्टर एवढे झाले. बीटी 3 कापूस क्षेत्र वाढल्यानंतर यामध्ये दुपटीने वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांद्वारे वर्तविला जात आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी एचटीबीटी कापसासाठी अनुकूल आहेत.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇