शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी बुलडाणा येथे सोमवार दि. 6 नोव्हेंबर रोजी एल्गार मोर्चा आयोजन करण्यात आले असून, एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गावागावातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा एल्गार मोर्चा हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा असून, या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.
आनंदाची बातमी : रोपवाटिका योजनेच्या अनुदानात 48 हजाराची वाढ
एल्गार मोर्चा म्हणजे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र येण्याची योग्य वेळ आहे. या मोर्चाच्या निमित्ताने बुलडाण्यातून शेतकऱ्यांच्या स्वातत्र्याच्या लढाईचा बिगुल फुंकले जाणार आहे. एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर जिल्हाभर फिरत आहेत. २८ ऑक्टोबर रोजी त्यांनी जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात शेतकरी पुत्र व युवा कार्यकर्त्यांनी तसेच शेतकरी, शेतमजुरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वरवट बकाल आणि जळगाव जामोद येथील बैठकीला शेतकरी, शेतमजूर व युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात युवा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव बुद्रूक आणि संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक या गावांमध्ये झालेल्या सभा लक्षवेधी ठरल्या आहेत.
मोठी बातमी : स्वतंत्र कृषि निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र पाहिले राज्य : संदिपान भुमरे
या दोन्ही सभांना शेतकरी, शेतमजूर आणि युवकांची प्रचंड उपस्थिती होती. सोयाबीन – कापसाचा भाव, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई, शेतमजुरांना संरक्षण, महिला बचत गटांची कर्जमाफी यासह शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी पक्षाचे झेंडे बाजूला ठेऊ आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ, असा नारा तुपकर यांनी दिला.

महत्त्वाची बातमी : सुशिक्षित युवकांनी नव्या तंत्राचा वापर करून शेती करावी : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1