शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल. एकही शेतकरी भरपाई आणि विम्यापासून वंचित राहणार नाही, गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे मदत मागू, असे वचन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार असेही आज केले. ते नुकासनग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी परभणी दौऱ्यावर असताना बोलत होते.
मोठी बातमी : किसान सभेचा ‘ओला दुष्काळ’ प्रश्नी आता निर्णायक संघर्ष
परतीच्या पावसाने मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पिकामध्ये पाणीच पाणी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान पाहाता विरोधकांनी राज्यात ओल्या दुष्काळाची घोषणा करा, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली जात आहे.
महत्त्वाची बातमी : गुलाबी बोंडअळीचा ‘नंदुरबार पॅटर्न’ फायद्याचा ठरणार
याचाच भाग म्हणून परभणीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी दौरा केला. त्यांनी जिंतूर आणि असोला या ठिकाणी शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील नुकसानीचाही त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते..

राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याची कबुली देवून कृषीमंत्री सत्तार म्हणाले, आहे. मी स्वतः आणि माझे अधिकारी बांधावर जाऊन किती नुकसान झाले, याची माहिती गोळा करत आहोत. साधारणतः सात आठ दिवसांमध्ये ही माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना मदतीचा जो काही निर्णय आहे तो घेतील.
ब्रेकिंग :
राज्यातील 81 हजार 564 लम्पी बाधित जनावरे रोगमुक्त
केंद्राकडेही आम्ही मदतीसाठी जाणार असल्याचे सांगून, कृषीमंत्री सत्तार पुढे म्हणाले, केंद्राचेही पथक राज्यात पाहणीसाठी येईल, त्यानंतर केंद्र सरकार, राज्य आणि पीक विमा अशी तीन प्रकारची मदत शेतकऱ्यांना दिली जाईल. एकही शेतकरी पीक विम्यापासून किंवा मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. तसेच राज्यात ओला दुष्काळात संदर्भात परिस्थिती नाहीये, मी हे चार वेळेला बोललो आहे. जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती आम्ही पाहून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मालेगाव परिसरातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी तूर, कापूस आदी पिकांची शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवादही साधला.
मोठी बातमी : ड्रोन शेतीमुळे रोजगार निर्मितीची संधी !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1