गेल्या वर्षापासून चिघळलेला एफआरपीचा प्रश्न आता मार्गी लागला असून आता एक महिन्याच्या आता शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे न दिल्यास साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांना दिले असल्याची माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली.
मोठी बातमी : शेतकर्यांनो राज्य नको राज्यकर्ते बदला : रघुनाथदादा
गेल्या काही दिवसांपासून ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. अखेर एकरकमी एफआरपी बाबत निर्णय झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असे असताना आता शेतकऱ्यांना FRP चे पैसे एका महिन्याच्या आत मिळणार आहेत. अन्यथा साखर कारखान्यांवर कारवाई होणार असल्याचे वक्तव्य सहकारमंत्री अतुल सावे यांनी केले आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक असून, एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे.

ऊस वाहतूकदारांच्या समस्यांबाबत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठविण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगून, राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे साखर कारखान्यांनी पालन केले नाहीतर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचेही अतुल सावे म्हणाले. सहकारच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देत आहोत. शिंदे आणि फडणवीस हे जनहिताचे निर्णय घेत आहे. यापुढेही असेच लोकहिताचे निर्णय घेतले जातील असेही ते म्हणाले.
ब्रेकिंग : चक्क डिसेंबरमध्ये उकाडा : पावसाचेही संकेत

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1