तांदूळ आणि ऊस या दोन्ही पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. देशांतर्गत गरज भागल्यावर या दोन्ही पिकांचे अतिरिक्त उत्पादन घेणे म्हणजे पाण्याची नासाडी करण्यासारखे आहे. देशातील मर्यादित जलसंपदेचा असा ऱ्हास होणे धोकादायक आहे, असे मत कृषिमाल व्यापार विश्लेषक एस. चंद्रशेखर यांनी व्यक्त केले.
आनंदाची बातमी : भारतातून 50 अब्ज डॉलर्स कृषिमालाची निर्यात
खरीप हंगाम 2022 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत उत्पादन वाढीचे उद्दिष्ट ठरवताना पर्यावरणाविषयक मुद्यांकडे डोळेझाक करण्यात आली, असे मत कृषिमाल व्यापार विश्लेषक एस. चंद्रशेखर यांनी व्यक्त केले.
चालू आर्थिक वर्षात देशभरातील कृषी उत्पादनाचे उद्दिष्ट ठरवताना पर्यावरणविषयक पैलूंकडे दुर्लक्ष झाले आहे. खरीप हंगामातील परिषदेत साखर आणि तांदूळ उत्पादनाचे वाढीव उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले त्यावरूनच हे सिद्ध होत असल्याचे चंद्रशेखर यांनी बिझनेस लाइनमधील एका लेखात नमूद केले आहे.

लक्षवेधी बातमी : भोंग्याचे राजकारण बंद करा, चना खरेदी सुरळीत करा, यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे भोंगा आंदोलन
तांदूळ आणि ऊस या दोन्ही पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. देशांतर्गत गरज भागल्यावर या दोन्ही पिकांचे अतिरिक्त उत्पादन घेणे म्हणजे पाण्याची नासाडी करण्यासारखे आहे. देशातील मर्यादित जलसंपदेचा असा ऱ्हास होणे धोकादायक असल्याचे चंद्रशेखर म्हणाले आहेत.
केवळ निर्यातीवर डोळा ठेवून गरजेपेक्षा जास्त तांदूळ अन साखरेचे उत्पादन घेणे समर्थनीय ठरू शकत नाही. भारत साधारणतः 1 कोटी टन तांदूळ, 6 ते 7 कोटी टन साखर निर्यात करतो. साखरेच्या निर्यातीसाठी अनुदान दिले जाते. भारताच्या या अनुदानाबाबत अन्य साखर निर्यातदार देशांनी जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत.
हे वाचा : सदाभाऊ खोत यांच्या ‘जागर शेतकऱ्यांचा, अक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाला उद्यापासून सुरूवात
तांदूळ आणि साखर निर्यातीच्या माध्यमातून आपण अप्रत्यक्ष आपला पाणीसाठाच निर्यात करत असल्याचे चंद्रशेखर म्हणाले आहेत. पर्यावरणाचा विचार करता आपण तांदूळ, साखर उत्पादनापेक्षा कमी पाण्यात आर्थिकदृष्ट्या परवडू शकणाऱ्या, परकीय चलन मिळवून देणाऱ्या अन्य पिकांचा विचार करायला हवा.
2022-2023 या आर्थिक वर्षातील खरिपासाठी 1 कोटी 12 लाख टन तांदूळ उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 2021-2022 च्या खरिपात 1 कोटी 10 लाख टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. खरिपात सरासरी 40 ते 42 लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची लागवड करण्यात येते.
हे नक्की वाचा : ४ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली : कृषिमंत्री तोमर

2022-2023 या आर्थिक वर्षात 4 कोटी 15 लाख टन साखर उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्यावर्षी 4 कोटी 14 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. सरासरी 5 कोटी हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड करण्यात येते. गेल्या काही वर्षांत आपली देशांतर्गत साखरेची मागणी 2 कोटी 70 लाख टन असताना आपण प्रत्यक्षात 3 कोटी टन साखरेचे उत्पादन घेतो.
लक्षवेधी बातमी : इंडोनेशियाचा निर्यात बंदीचा निर्णय : खाद्यतेल अजून भडकणार
अतिरिक्त उत्पादनाचा फटका बसल्याने देशांतर्गत दर प्रभावित होतात. त्यामुळे ऊस लागवडीचे प्रमाण नियंत्रणाखाली आणायला हवे, अशी गरज व्यक्त करताना चंद्रशेखर यांनी, नीती आयोगानेही अशीच शिफारस केली असल्याचे म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी नीती आयोगाने ऊस लागवडीत 30 लाख हेक्टरची कपात करण्याची शिफारस केली होती. मात्र नीती आयोगाच्या या शिफारशीकडे केंद्रीय कृषी मंत्रालयाने दुर्लक्ष केले असल्याचेही चंद्रशेखर यांनी नमूद केले आहे.
आनंदाची बातमी : नाशिक येथे 2 मे रोजी कृषि पुरस्कारांनी 198 शेतकऱ्यांचा होणार सन्मान !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1