यंदा कोकणातील काजू पिकावर हवामान बदलाचा तसेच मागील दोन महिन्यातील उन्हाच्या तडाख्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे काजू बियाचे वजन कमालीचे घटले असून बियांचा आकार लहान झाला आहे. परिणामी काजू उत्पादनवर त्याचा मोठा परिणाम होत आहे.
हे नक्की वाचा : राज्यात काही ठिकाणी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
फेबुवारी आणि मार्च महिन्यातल कडक उन्हाचा परिणाम यंदा कोकणातील काजू पिकावर झाला आहे. त्यामुळे कोकणातील काजू हंगाम वाया जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामानातील बदलामुळे यंदा काजू बीयांचा आकार लहान झाला आहे. परिणामी काजू बियांचे वजन घटले आहे.
पूर्वी एका किलोमध्ये 150 बी बसायचे आता आकार लहान झाल्याने 200 ते 225 बी बसतात. काजू बी लहान असल्याने बाजारपेठेत दर प्रतिकिलो शंभर रुपयांपर्यंत खाली आला आहेत. यामुळे काजू उत्पादकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
मोठी घोषणा : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला संशोधन प्रकल्पांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर
कोकणात गावठी काजूबरोबर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वेंगुर्ला-4 आणि वेंगुर्ला-5 या जातींची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. यंदा हवामानातील बदलामुळे काजूवर सुरुवातीपासून फुलकिडे, टी-मॉस्कुटो किडींचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कीडनाशक फवारणीच्या खर्चात यंदा वाढ झाली आहे.
यंदा किडीच्या प्रादुर्भावामुळे काजू बियाच्या टरफलावर काळे डाग पडले आहे. किडीमुळे बियांचा आकार लहान झाला आहे. यंदा वाळलेले काजू बी फेब्रुवारीपासूनच बाजारात आले आहे. सुरवातीला काजू बियांचा दर 130 ते 135 रुपये किलो होता. सध्या तो घसरून 100 ते 105 रुपये प्रति किलोवर आला आहे. मोठी बी असेल तरच प्रति किलोस 110 ते 115 रुपये दर मिळतो. सरसकट बी दिली तर प्रति किलोस शंभर रुपयेच दर मिळतो. दोन वर्षांपूर्वी काजू बीला 150 रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला होता. त्या तुलनेत दर कमी मिळत असल्याने काजू उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत.
धक्कादायक : मराठवाड्यात रोज 2 शेतकरी करत आहेत आत्महत्या !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1