शेतकरी बांधवांनो..! तुम्हाला माहीत आहे का ? नॅशनल रेनफेड एरिया अथॉरिटी (नागपूर) नुसार, गेल्या 70 वर्षांत भारतातील जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 1 टक्क्यांवरून 0.3 टक्क्यांपर्यंत घसरले आहे, ही कृषी क्षेत्रासाठी चिंतेची बाब आहे. सेंद्रिय कर्ब हा मातीतील सेंद्रिय पदार्थाचा मुख्य घटक आहे आणि मातीला पाणी धरून ठेवण्याची क्षमता, रचना आणि सुपीकता देतो.
महत्त्वाच्या टिप्स : सेंद्रिय कर्बाच्या वाढीसाठी कोंबडी खताची जादू
जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे पिकाची उत्पादकता कमी होते, त्यामुळे जमिनीत असलेल्या फायदेशीर सूक्ष्मजीवांची संख्या देखील कमी होत आहे जे वनस्पतींना पोषक तत्वे पुरवण्यास मदत करतात. शाश्वत आणि विषमुक्त शेतीसाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशके आणि रासायनिक खतांवर अवलंबून राहणे कमी केले पाहिजे. केवळ सेंद्रिय खते जमिनीची उत्पादकता आणि सेंद्रिय कर्बाची पातळी वाढवू शकतात.
सेंद्रिय कर्ब म्हणजे काय ?
सेंद्रिय पदार्थामध्ये असलेल्या आवश्यक कार्बनला सेंद्रिय कर्ब असे म्हणतात. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीचे आरोग्य तर वाढतेच, शिवाय पीक विषमुक्त होऊन अधिक उत्पादन मिळण्यासही मदत होते.
सेंद्रिय कर्बाची गरज का आहे ?
जमिनीतील जैवरसायन संतुलन राखण्यासाठी सेंद्रिय कर्ब महत्त्वाचा आहे. त्यामुळे पिकामध्ये नायट्रोजन, स्फुरद, झिंक अशा अनेक पोषक तत्त्वांची उपलब्धता आहे. सेंद्रिय कार्बच्या उपलब्धतेमुळे जमिनीतील फायदेशीर जिवाणूंची संख्या झपाट्याने वाढू शकते आणि हे फायदेशीर जिवाणू पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यास मदत करतात.
महत्त्वाची गोष्ट : चुनखडीयुक्त जमिनीत असे करा नत्र आणि स्फुरदाचे व्यवस्थापन
ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि पिकाची उत्पादकता आणि गुणवत्ता लक्षणीय वाढ दिसते. तसेच ते सक्रियरित्या जमिनीची जैवविविधता टिकवून ठेवण्यास मदत करते. सेंद्रिय कर्बामुळे मातीची रचना, सच्छिद्रता तसेच मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते आणि हवा, पाणी यांना जमिनीत खेळते ठेवते.
हे नक्की वाचा : पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करा गांडुळ खताचा वापर
हे पिकाच्या फांद्याच्या वाढीस गती देते, मुळे विकसित करते, संपूर्ण झाडाच्या आत अन्नद्रव्य आणि पाणी घेण्यास सक्रियपणे सहकार्य करते. त्यामुळे पिकामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन वाढण्यास मदत होते.
सतीश राठोड, उत्पादन विकास कार्यकारी, जिओलाइफ अग्रीटेक ई. प्रा. लि., मुलुंड, नवी मुंबई (मो. 9403199937)
फायद्याच्या टिप्स : सेंद्रिय शेतीमध्ये निंबोळी पेंडीचे फायदे
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1