• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Tuesday, June 3, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

मेथीच्या अधिक उत्पादनासाठी महत्त्वाच्या टिप्स्

शेतीमित्र by शेतीमित्र
November 18, 2024
in भाजीपाला
0
मेथीच्या अधिक उत्पादनासाठी महत्त्वाच्या टिप्स्
0
SHARES
15
VIEWS

शेतकरी आता पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेतीचा अवलंब करून शेतीतून अधिक नफा मिळवत आहेत. पाहिले तर मेथी या पिकांची मागणी देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत बऱ्यापैकी आहे. महाराष्ट्रात बहुतेक सर्व जिल्ह्यांत मेथीची लागवड केली जाते. भाजीपाला पिकांमध्ये मेथी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी असून, मेथीचा वापर दैनंदिन आहारात विविध प्रकारे केला जातो. त्यामुळेच मोठ्या शहरांच्या आसपासच्या भागात मेथीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.

महाराष्ट्रातील हवामानात मेथीचे पीक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत घेता येते. भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी टप्प्याटप्प्याने लागवड करून जवळजवळ वर्षभर मेथीचे पीक घेता येते.

मेथीचे महत्त्व व उपयोग : मेथीची हिरवी पाने आणि कोवळ्या फांद्या भाजीसाठी वापरतात. मेथीच्या बियांचा म्हणजे मेथ्यांचा मसाल्यामध्ये आणि लोणच्यामध्ये तसेच भाजी करताना उपयोग करतात. मेथीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मेथीची भाजी पाचक असून मेथीच्या भाजीमुळे यकृत आणि प्लिहा यांची कार्यक्षमता वाढून पचनक्रिया सुधारते. मेथीमध्ये प्रोटीन्स आणि मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, इत्यादी खजिने तसेच ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.  

agrovision 1

हवामान व जमीन : मेथी हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे. विशेषत: कसुरी मेथीला थंड हवामान मानवते म्हणून हिवाळ्यातच या मेथीची लागवड करतात. मेथी हे कमी दिवसांत तयार होणारे पीक आहे. विविध प्रकारच्या हवामानांत मेथीचे पीक येत असले तरी उष्ण हवामानात पिकाची वाढ कमी होऊन चांगल्या दर्जाची भाजी मिळत नाही. मेथीच्या लागवडीसाठी मध्यम ते कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. 

मेथी लागवडीचा हंगाम : मेथी हे थंड हवामानातील पीक असले तरी महाराष्ट्रातील खरीप आणि रब्बी हवामानात मेथीचे पीक घेतले जाते. मेथीची लागवड खरीप हंगामात जून-जुलै महिन्यात आणि रब्बी हंगामात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करतात. भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी पेरणी टप्प्याटप्प्याने करतात. समशीतोष्ण हवामान आणि पाण्याचा नियमित पुरवठा असल्यास मेथीची लागवड वर्षभर करता येते. परंतु थंड हवामानात उत्पादन आणि पिकाचा दर्जा चांगला मिळतो.

बियाणे : नेहमीच्या मेथीचे हेक्टरी 25 ते 30 किलो बियाणे लागते; तर कसुरी मेथीचे बी बारीक असल्याने हेक्टरी 20 किलोच बियाणे लागते. मेथीचे पीक दुसऱ्या पिकांत आंतरपीक म्हणून घेतल्यास त्यानुसार बियाणे कमी लागते. बियाणे पेरताना एकसारखे आणि विरळ पडेल याची दक्षता घ्यावी.

लागवड पद्धत : मेथीची लागवड सपाट वाफ्यांमध्ये 20-25 सेंटिमीटर अंतरावर ओळीतून पेरून किंवा बी फोकून करतात. आंतरपीक म्हणून मेथीचे पीक घेताना मुख्य पिकामधील मोकळ्या जागेत मेथीचे बी 20-25 सेंटिमीटर अंतरावर ओळीत पेरावे.

मेथीच्या लागवडीसाठी 3 X 2 मीटर आकाराचे किंवा त्यापेक्षा अधिक लांबीचे सपाट वाफे तयार करून त्यात बी फोकून किंवा ओळीत पेरणी करतात. पेरणीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. बी ओळीत पेरल्यास खुरपणी आणि तण काढणे सोपे होते. तसेच काढणी करणे सोपे जाते. नेहमीची मेथी पेरणीनंतर 3 – 4 दिवसांत उगवते तर कसुरी मेथीचा उगवण होण्यास 6 – 7 दिवस लागतात.

मेथी पिकाचे खत व्यवस्थापन : मेथीच्या पानांची चांगली वाढ होण्यासाठी मेथीच्या पिकाला नत्रयुक्त खताची आवश्यकता असली तरी हे शेंगवर्गीय कुळातील पीक असल्यामुळे सुरुवातीला हेक्टरी 20 किलो नत्र आणि त्यानंतर 15 दिवसांनी खुरपणी करून हेक्टरी 20 किलो नत्र दिल्यास पिकाची वाढ जोमदार होते किंवा पेरणीनंतर 3 आठवड्यांनी 10 लीटर पाण्यात 150 ग्रॅम युरिया मिसळून फवारणी केल्यास मेथीचे उत्पादन आणि प्रत सुधारते. पिकाचा खोडवा घेतल्यासही वरीलप्रमाणे खतांचा वापर करावा.

मेथी पिकाचे पाणी व्यवस्थापन : मेथीला नियमित पाणी देणे आवश्यक आहे. कोवळी आणि लुसलुशीत भाजी मिळविण्यासाठी 4 – 6 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याचा नियमित पुरवठा केल्यास अधिक उत्पादन मिळून खोडवेही जास्त घेता येतात. या पिकाच्या सुरुवातीच्या काळात तण काढून पीक स्वच्छ ठेवावे.

मेथीवरील किडी, रोगांचे नियंत्रण : मेथीवर मावा आणि पाने पोखरणारी अळी (लीफ मायनर) या किडींचा प्रादुर्भाव होतो. मावा कीड काळसर रंगाची असून पानांच्या खालच्या भागावर आणि शेंड्यांवर राहून मोठ्या प्रमाणात पानांमधील रस शोषून घेते. यामुळे रोपे निस्तेज होऊन मालाची प्रत खराब होते.

पाने पोखरणारी कीड पानांमधील रस शोषून घेत वेडीवाकडी पुढे जाते. त्यामुळे पानांवर पांढऱ्या रंगाच्या वेड्यावाकड्या ओळी दिसतात आणि मालाची प्रत खराब होते.

या किडीच्या नियंत्रणासाठी पीक लहान असतानाच 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर मॅलॅथिऑन मिसळून दर 8-10 दिवसांच्या अंतराने पिकावर फवारावे. पीक काढणीच्या 8 दिवस आधी औषधे फवारू नयेत.

मेथीच्या पिकावर रोगाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. मात्र काही वेळा मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकांची फेरपालट करावी. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. बियांची दाट पेरणी करू नये. पिकाला नियमित पाणी द्यावे आणि शेतात स्वच्छता राखावी.

मेंथी पिकाच्या वेळी शेतकऱ्यांनी दीमकांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण या पिकावर दीमकाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता खूप जास्त आहे. जर दीमक एकदा पिकावर प्रादुर्भाव करत असेल तर ते संपूर्ण पीक खराब करू शकतात. याला प्रतिबंध करण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकावर 2.5 लिटर क्लोरपायरीफॉस प्रति हेक्टरी फवारणी करावी.

याशिवाय केसाळ सुरवंट देखील मेंथी पिकावर प्रादुर्भाव करतात ज्यामुळे पिकाची पाने नष्ट होतात. या किडीपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी 500 एम. डायक्लोरव्हास 700-800 लिटर पाण्यात विरघळवून पिकावर पूर्णपणे फवारणी करावी.

मेंथी पानांची सुरक्षितता : मेंथा पिकाची योग्य काळजी न घेतल्याने मेंथीच्या पानांवर तपकिरी रंगाचे डाग पडतात. हे डाग मेंथाच्या पानांचा नाश करतात. या रोगामुळे पाने पिवळी पडू लागतात व सुकून पडतात. हे टाळण्यासाठी शेतकऱ्याने 2 किलो मॅन्कोझेब 75 डब्ल्यूपी 800-1000 लिटर पाण्यात विरघळवून प्रति हेक्टरी फवारणी करावी.

रोपे लावताना या गोष्टी लक्षात ठेवा : मेंथी पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याने लागवड करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. उदाहरणार्थ, प्रथम झाडाला 0.1 टक्के कार्बेन्डाझिमच्या द्रावणात सुमारे 15-20 मिनिटे बुडवा. त्यानंतरच शेतात रोप लावावे. असे केल्याने पिकाची वाढ चांगली होते आणि रोगाची शक्यताही कमी होते.

मेथीची काढणी : बी पेरल्यापासून 30-35 दिवसांनी मेथीचे पीक काढणीला तयार होते. मेथीची काढणी करताना संपूर्ण रोपटे मुळांपासून उपटून काढतात किंवा जमिनीलगत खुडून घेतात. मेथीच्या पिकाचा खोडवा 2-3 वेळा घेता येतो. कसुरी मेथीचे जास्त खोडवे घेता येतात. प्रामुख्याने हिवाळ्यात खोडवा घेणे शक्य होते. काही वेळा 2-3 खुडे घेतल्यावर पीक बियांसाठी ठेवतात. मेथीची पाने तजेलदार असताना आणि फुले येण्यापूर्वी काढणी करावी.  काढणीच्या 2-3 दिवस आधी पाणी दिल्यास काढणी करणे सोपे जाते आणि पाने ताजी राहतात.

मेथीचे उत्पादन आणि विक्री : मेथी काढणीनंतर मेथीच्या योग्य आकाराच्या जुड्या बांधून कापडात किंवा जाळीदार पिशव्यांमध्ये अथवा बांबूच्या टोपल्यांमध्ये जुड्या व्यवस्थित रचून बाजारात विक्रीसाठी पाठवाव्यात. मेथीच्या जुड्या तुडवल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच काढणी संध्याकाळी करावी म्हणजे ताजी भाजी बाजारपेठेत पाठवता येते. मुळांना जास्त माती असल्यास मुळे पाण्यात धुऊन झटकून घ्यावीत, म्हणजे भाजी सडत नाही. मेथीची काढणी आणि विक्री ह्यांमध्ये कमीत कमी कालावधी असावा.

मेथीचे उत्पादन : मेथीचे उत्पादन काढणीच्या पद्धतीनुसार दर हेक्टरी सरासरी 7-8 टन इतके मिळते. कसुरी मेथीचे उत्पादन दर हेक्टरी सरासरी 9 ते 10 टन इतके मिळते.

मेथीचे बीजोत्पादन : मेथीचे पीक बियाण्यासाठी ठेवल्यास साध्या मेथीचे हेक्टरी 10 ते 15 क्विटल तर कसुरी मेथीचे हेक्टरी 6 ते 7 क्विटल एवढे बियाणे मिळते. बीजोत्पादनासाठी पेरणी 30 सेंमी. अंतरावर करावी. बीजोत्पादनास आक्टोबरनोव्हेंबर महिन्यात पेरणी करावी. बीजोत्पादनास पायाभूत बियाणे तयार करण्यासाठी दोन वाणांतील विलगीकरण अंतर 50 मीटर इतके असावे तर प्रमाणित बियाण्यासाठी 10 मीटर अंतर ठेवावे. 3 ते 4 वेळा पाहणी करून भेसळयुक्त रोपे उपटून काढावी. पीक तयार होऊन शेंगा पक्व होतात त्या वेळी काढणी करावी.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Tags: FenugreekPlanting vegetablesभाजीपाला लागवडमेथी उत्पादन टिप्स्मेथीभाजी
Previous Post

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

Next Post

केळी बागेचे हिवाळ्यातील व्यवस्थापन

Related Posts

Rangda onion Crop :  रांगडा कांदा भरघोस उत्पादणासाठी असे करा नियोजन
भाजीपाला

Rangda onion Crop :  रांगडा कांदा भरघोस उत्पादणासाठी असे करा नियोजन

October 25, 2023
Tomato Import : दरवाढीच्या नियंत्रणासाठी टोमॅटोची नेपाळमधून आयात : अर्थमंत्री सीतारामण
भाजीपाला

Tomato Import : दरवाढीच्या नियंत्रणासाठी टोमॅटोची नेपाळमधून आयात : अर्थमंत्री सीतारामण

August 12, 2023
35 दिवसात कोथिंबीरीचे 6 टन उत्पादनतंत्र
भाजीपाला

35 दिवसात कोथिंबीरीचे 6 टन उत्पादनतंत्र

July 11, 2023
भेंडी लावताय ? असे करा नियोजन !
भाजीपाला

भेंडी लावताय ? असे करा नियोजन !

June 5, 2023
ब्रिमेटो : एकाच झाडाला येणार टोमॅटो आणि वांगी
नवे तंत्रज्ञान

ब्रिमेटो : एकाच झाडाला येणार टोमॅटो आणि वांगी

May 18, 2023
कोबीवर्गीय फळभाजीवरील या खतरनाक 6 बुरशीजन्य रोगावर असे मिळवा नियंत्रण
किड-रोग व तणे

कोबीवर्गीय फळभाजीवरील या खतरनाक 6 बुरशीजन्य रोगावर असे मिळवा नियंत्रण

November 29, 2022
Next Post
केळी बागेचे हिवाळ्यातील व्यवस्थापन

केळी बागेचे हिवाळ्यातील व्यवस्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230469
Users Today : 25
Users Last 30 days : 1568
Users This Month : 68
Users This Year : 4799
Total Users : 230469
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us