पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवार, दि. 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौर्यावर येणार असून, सकाळी 9.25 वाजता ते दिल्लीवरून नागपूर विमानतळावर येणार आहेत. नागपूर येथे सव्वातीन तासात ते अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून, मुख्यत: त्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गचे उद्घाटन करण्यात येणार आहेत. मोदी यांचा अधिकृत दौरा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
हे नक्की वाचा : स्वावलंबनासाठी शेतीसोबत जोडव्यवसायाचे ज्ञान आवश्यक : राज्यपाल
त्यानुसार पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते फक्त समृद्धी महामार्गच नव्हे तर नागपूर मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. सोबतच नागपूर रेल्वे स्थानकावर ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मोदी यांचा अधिकृत दौरा प्रशासनाला प्राप्त झाला असून, ते सकाळी 7.50 वाजता दिल्ली विमानतळावरून निघणार आहेत. नागपूर विमानतळावर ते 9.25 वाजता दाखल होतील. तेथून ते गाडीने 9.40 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचतील. 9.45 ते 9.55 अशी दहा मिनिटे ते येथे थांबणार आहेत.
मोठी बातमी :
राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी पी. आर. पाटील यांची वर्णी
वंदे भारत एक्स्पेसला हिरवी झेंडी दाखवून ते मेट्रो रेल्वेच्या झिरो माईल चौकातील फ्रिडम पार्क प्रदर्शनाला भेट देणार आहे. येथूनच ते मेट्रोतून खापरी स्थानकापर्यंत सफर करणार आहेत. 10.30 वाजता केपी ग्राऊंड ते ऑटोमोटिव्ह चौक तसेच सीताबर्डी ते प्रजापतीनगर या दोन मेट्रो रेल्वे मार्गाचे लोकार्पण करतील. त्यानंतर 10.45 वाजता समृद्धीच्या झिरो माईल येथून समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटर प्रवास करून ते उद्घाटन करतील. त्यानंतर एम्सच्या टेंपल ग्राउंडवर ते संबोधित करणार आहेत.
मोठा निर्णय : पुढील हंगामापासून उसाचा काटा होणार डिजिटल !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1