कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाशी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये एक ऑगस्ट 2022 पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हैस दुधासाठी प्रतिलिटर 2 रुपये व गाय दुधासाठी प्रतिलिटर 1 रुपये वाढ केली आहे. गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.
लक्षवेधी बातमी : मराठवाड्यात शंखी गोगलगाय बरोबरच आता पैसा किटकांचे पिकावर संकट
एक ऑगस्टपासून म्हैस दूध खरेदी दर 6.0 फॅट व 9.0 एस.एन.एफ प्रतीच्या दुधास प्रतिलिटर रुपये 45.50 दर राहील. गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ. प्रतीचे दुधास प्रतिलिटर रुपये 30 रुपये असा दर राहील, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली

मान्सून अपडेट : ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पाऊस
संघाच्या कोल्हापूर, मुंबई, पुणे विभागांमध्ये वितरित होणाऱ्या फूल क्रीम दूध विक्री दरात 2 रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात येणार आहे. तसेच गाय दूध, टोण्ड दूध, स्टँडर्ड दूध विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात आले आहेत.
ब्रेकिंग न्यूज : अतिवृष्टीबाधितांना यंत्रणांनी तातडीने सहाय्य करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1