Minimum Support Price (MSP) : केंद्र सरकारने (Central Govt) शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय (Big decision) घेतला आहे. सहा रब्बी हंगामातील पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना (Farmers) दिवाळी गिफ्ट (Diwali gift) दिली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. रब्बी हंगामातील (Rabi Season) सहा पिकांच्या आधारभूत किंमतीत 2 ते 7 टक्क्यांची वाढ केली आहे.
ब्रेकिंग : कृषीमंत्री म्हणाले … तर मी देखील दिवाळी साजरी करणार नाही !
केंद्र सरकार (Central Govt) शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmers’ Income) वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी केंद्र सरकारने वेळोवेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने अनेक पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ केली आहे. आज सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) रब्बी हंगामातील सहा पिकांच्या किमान आधारभूत किंमती (Minimum Support Price) 2 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकारने एकूण सहा रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांच्या आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बार्ली, गहू, हरभरा, मसूर, मोहरी आणि सूर्यफूल यांचा समावेश आहे. गव्हाच्या आधारभूत किंमतीत 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तेलबिया आणि मोहरीच्या MSP मध्ये 200 रुपये प्रति क्विंटल, मसूर 425 रुपये प्रति क्विंटल, बार्ली 115 रुपये, हरभरा 105 रुपयांची वाढ आणि सूर्यफुलाच्या दरात 150 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या वाढीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
मोठी बातमी : 86032 उसाच्या वाणाला आता 15012 नवा पर्याय
यामुळे 2024-25 हंगामात रब्बी (Rabi Season) पिकाला चांगली किमान आधारभूत किंमती (MSP) मिळणार आहे. ही वाढ झाल्याने आता गहू (Wheat) प्रति क्विंटल 2 हजार 275 रुपये, बार्ली (Barley) प्रति क्विंटल 1 हजार 850 रुपये, हरभरा (Gram) 5 हजार 440 रुपये प्रति क्विंटल, मसूर (Lentil) प्रति क्विंटल 6 हजार 425 रुपये, मोहरी (Mustard) प्रति क्विंटल 5 हजार 650 रुपये तर सूर्यफूल (Sunflower) प्रति क्विंटल 5 हजार 800 रुपये अशी किमान आधारभूत किंमती मंजूर करण्यात आली आहे.
केंद्र सरकार कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किंमत (MSP) ठरवते. त्यानुसार 23 पिकांचा एमएसपीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये गहू, भात, बाजरी, मका, ज्वारी, नाचणी आणि जो ही 7 तृणधान्ये (Cereals), हरभरा, मूग, मसूर, वाटाणा, उडीद ही 5 कडधान्ये (Pulses), मोहरी, सोयाबीन, तीळ, करडई, भुईमूग, सूर्यफूल, नायजर बियाणे ही 7 तेलबिया (Oilseeds) आणि ऊस, कापूस, कोपरा आणि कच्चा ताग या 4 नगदी पिकांचा (Cash crops)समावेश आहे.
महत्त्वाची बातमी : बिकानेरच्या केंद्रीय कोरडवाहू फळ संशोधन केंद्राकडून डॉ. नवनाथ कसपटे यांची दखल
https://www.facebook.com/shetimitramagazine03