दिवाळीच्या तोंडावर दूध उत्पादकांना दिलासा देणारी एक बातमी आहे. गोळुळ दूध संघाने दूध खरेदी दरात वाढ करून दूध उत्पादकांना दिवाळी भेट दिली आहे. म्हशीच्या आणि गाईच्या दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. उद्यापासून नव्या दूध दरवाढीची अंमलबजावणी केली जाणार आहे.
ब्रेकिंग न्यूज : दिवाळीनंतर कांदा महागणार !
नव्या दरांप्रमाणे आता म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 2 रुपये वाढ करण्यात आली आहे. तर गाईच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, म्हशीच्या दूध विक्री दरातही वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतर आता म्हशीला प्रति लिटर 47.50 पैसे तर गाईला प्रति लिटर 35 रुपये दर मिळणार आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या दीड वर्षात 9 रुपयांची दूध दरवाढ नोंदवण्यात आली आहे. तर आतापर्यंत सहा वेळा दूध खरेदी-विक्री दरात वाढ करण्यात आली आहे.

हे वाचा : भाजीपाल्याचे भाव कडाडले !
दुसरीकडे म्हशीच्या दूध विक्री दरातही 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आधी म्हशीच्या एक लिटर दुधाचा दर कोल्हापूरमध्ये 60 रुपये होता. तो आता 63 रुपये इतका झाला आहे. तर अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 30 रुपयांवरुन 32 रुपये इतकी झाली आहे. मुंबई, पुण्यात एक लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 66 रुपयांवरुन आता 69 रुपये झाली आहे. तर अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 33 रुपयांवर 35 रुपये इतकी झाली आहे.
आनंदाची बातमी : रब्बीच्या ‘या’ बियाण्यासाठी मिळणार अनुदान
6.0 फॅट आणि 9.0 एसएनएफ प्रतिलिटर 45.50 पैसे इतका खरेदी दर म्हशीच्या दुधाला आधी मिळत होता. तो आता 47.50 झाला असून गायीच्या दूधाचा खरेदी दर 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ प्रतिलीटर 32 वरुन 35 रुपये इतका झाला आहे. उद्यापासून म्हणजेच 21 ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत.
मोठी बातमी : रब्बीच्या सहा पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1