लाल मिरचीच्या बाजारात दर वाढीचा ठसका वाढला असून, सध्या लाल मिरचीचे दर 20 ते 30 रुपयांनी वाढले आहेत. तर आगामी दोन महिन्यात हे दर 200 ते 650 किलोंपर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जानेवारी महिन्यापासून हिरव्या मिरचीचे उत्पादन घटल्याने लाल मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे याचा नक्कीच ग्राहकांना फटका बसणार आहे.
ब्रेकिंग न्यूज : मराठवाड्यातील 60 पैकी 28 कारखान्यांचे गाळप थांबले
गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारपेठत मिरचीची आवक कमी झाली असल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर सध्या बाजारात बेडगी मिरची 450 ते 460 रुपये प्रतिकिलो मिळत आहे. गुंटूर मिरची 200 ते 230 रुपये किलो, चपाटा मिरची 360 रुपये किलो, तेजा मिरची 230 रुपये प्रतिकिलो मिळत आहे. तर रसगुल्ला मिरची हि सर्वाधिक महाग म्हणजेच 600 रुपये किलो मिळत असल्याचे चित्र बाजारात आहे. या दरात आणखी वाढ सुरूच राहणार असून, पुढील दोन महिने लाला मिरचीच्या बाजारात तेजी राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

महत्त्वाची बातमी : राज्यातील धरणांमध्ये 37 टक्के पाणीसाठा शिल्लक
अवकाळी पावसाळ्याचा फटका इतर पिकांप्रमाणे मिरचीला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात निघणाऱ्या मिरचीची आवक घटली आहे. त्यांनतर बाजारात सतत मिरचीची हवी तशी आवक पाहायला मिळाली नाही. त्यामुळे त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहे. राज्यातल्या अनेक भागात मिरचीचे यावर्षी उत्पन्न घटल्याने आवक सुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे आता कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणसह आदी राज्यांतून मिरची आयात करावी लागत आहे. किलोमागे 20 ते 30 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे. तर मिरचीचे भाव वाढल्याने मिरची पावडरचे दर देखील वाढले आहेत.
हे नक्की वाचा : पुण्यात होणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1