गेल्या आठवडाभरात गव्हाच्या किंमती चार टक्क्यांची वाढ झाली आहे. लवकरच सणासुदीचे दिवस सुरु होणार असून त्यामुळे गव्हाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, देशांतर्गत गरज आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी गव्हाचा पुरेसा साठा शिल्ल्क असल्याची माहिती केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना पत्र : रडायचं नाही, लढायचं… अशा शब्दात मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना दिलासा
देशात गव्हाचा पुरेसा साठा असल्याची दावा माहिती केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने केला असून, भारत गहू आयात करणार असल्याचे वृत्तही केंद्र सरकारने फेटाळून लावले आहे. मात्र मिल ग्रेड गव्हाच्या किंमती गेल्या आठवड्यात एक रुपये किलोने वाढल्या आहेत. उत्तर भारतात गव्हाच्या किंमती 24 रुपये किलो ते 25.50 रुपये किलोपर्यंत पोहोचल्या आहेत.
दरम्यान, गव्हाच्या प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्याचा परिणाम गव्हाच्या पिकावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने गव्हाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. या हंगामात गव्हाची मागणी वाढणार आहे. सणासुदीच्या हंगामात ग्राहक मोठ्या प्रमाणावर गव्हाची खरेदी करत असतात. 10 सप्टेंबरपासून खरेदी सुरु होण्याची शक्यता असल्याने, किंमती आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांकडून बोलले जात आहे.
मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतीसाठी जाहीर केले हे महत्वपूर्ण निर्णय
या महिन्यात जारी केलेल्या चौथ्या आगाऊ अंदाजानुसार, सरकारने 2021-22 गव्हाचे उत्पादन 106.84 दशलक्ष टन झाले असल्याचे म्हटले आहे. मात्र या आकडेवारीवर विश्वास बसत नसल्याचे व्यापारी वर्गातून बोलले जात आहे. सरकार सांगत असलेला पीक आकडा खूप जास्त आहे. तो जुळत नाही. जर सरकारी आकडे बरोबर असतील, तर बाजारात या भावात गव्हाची खरेदी-विक्री का होत आहे ? असा सवाल व्यापार्यांकडून केला जात आहे. व्यापार आणि उद्योगांचा असा अंदाज आहे की भारताचे 2021-22 गव्हाचे उत्पादन हे 90 दशलक्ष टन ते 94 दशलक्ष टन दरम्यान असू शकते. मागणी आणि पुरवठा यांच्यात फरक असल्याने भारतातील गव्हाच्या किंमती वाढत असल्याची माहिती गहू निर्यातदारांनी दिली आहे.
उष्णतेच्या लाटेचा देखील गव्हाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. भारताने मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर आटा आणि मैदा यासारख्या गहू उत्पादनांच्या निर्यातीवर निर्बंध आणले होते. ज्यामुळे किंमती तात्पुरत्या खाली आल्या होत्या. मात्र, आता गव्हाच्या किंमतीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, व्यापार्यांचे म्हणणे आहे की गव्हावर आयात शुल्क शून्य करणे नजीकच्या भविष्यात उपयुक्त ठरणार नाही. कारण देशांतर्गत किंमती आयात केलेल्या गव्हाच्या किंमतीपेक्षा खूप जास्त आहेत. दुसरीकडे जागतिक स्तरावर, गव्हाच्या किंमती कमी होऊ लागल्या आहेत.
महत्त्वाची बातमी : कांदा दरातील घसरण सुरूच
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1