पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेच्या 1.90 लाख रुपयांच्या अनुदानात 48 हजारांनी वाढ करण्यात आली आहे. शेडनेट या घटकासाठी आता 2.38 लाख एवढे अनुदान मिळणार आहे. हे अनुदान 22 ऑगस्ट 2022 पासून पूर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांना लागू राहणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
मोठी बातमी : स्वतंत्र कृषि निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र पाहिले राज्य : संदिपान भुमरे
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत भाजीपाला पिकांच्या दर्जेदार व कीडमुक्त रोपांच्या निर्मितीवर प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्याच उद्देशाने अनुदान योजना राबविली जात आहे. यापूर्वी प्रति रोपवाटिकेसाठी 5.55 ला रुपये खर्च ग्राह्य धरून 50 टक्के अनुदान देय होते. यातील शेडनेट या घटकाला प्रकल्प मूल्य 3.80 लाखांचे 50 टक्के म्हणजे 1.90 लाख अनुदान देय होते.
शेडनेट उभारणीकरिता लागणारे साहित्य, वेल्डिंग, फॅब्रिकेशन, वाहतूक, मजुरी व स्टीलच्या दरात वाढ झाल्याने शेडनेटसाठी प्रकल्प मूल्यात 3.80 लाखांवरून 4.75 लाखांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाडिबीटी पोर्टलवर फलोत्पादन घटकासाठी अर्ज करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले.
महत्त्वाची बातमी : सुशिक्षित युवकांनी नव्या तंत्राचा वापर करून शेती करावी : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1