द्राक्ष तोडणीच्या दरम्यान सांगली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम थेट द्राक्षावर (grapes) झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे द्राक्षाला तडे गेले आहेत. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांचे मात्र न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. याचा परिणाम उत्पादनावर तर होणारच आहे पण द्राक्ष तडकण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांनी थेट द्राक्ष खरेदीच बंद केली आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीपासून सुरु झालेले संकट आता संपल्यावरच मिटणार अशी अवस्था आहे.
उत्पादनात घट झाल्यावर दर वाढणार हे बाजारपेठेचे सूत्र आहे. पण द्राक्षाच्या बाबतीत यंदा सर्वकाही उलटे होताना दिसत आहे. कारण यंदा उत्पादन घटले असताना हंगाम सुरु होताच द्राक्षाच्या दरात कमालीची घट झाली होती. वाढत्या उन्हाबरोबर द्राक्ष मागणीत वाढ होऊ लागली होती. मात्र, अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे. अजूनही शेकडो एकरावरील द्राक्ष हे बागेतच आहेत. विशेषत: तासगाव तालुक्यात अवकाळीने थैमान घातल्याने बागांमध्ये पाणी साचले होते.
हेही वाचा : टोमॅटोचे दर घसरल्याने टोमॅटो उत्पादक अडचणीत

हे नक्की वाचा : पीएम किसान योजनेच्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ ?
ज्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष तोडणी झाली आहे त्यांच्यासाठी हा पाऊस चांगलाच आहे. पण ज्या बागांमध्ये द्राक्ष अजूनही वेलीवरच आहेत त्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वी बागा जोपासण्यासाठी एकरी हजारो रुपये केवळ औषध फवारणीसाठी खर्ची केले आहेत. आता अंतिम टप्प्यात उत्पन्ना ऐवजी अशी निराशा होत असेल तर आगामी काळात द्राक्ष बागा ठेवल्या जातात की नाही अशी परस्थिती निर्माण होईल.
हेही वाचा : खासबात ! यंदाही महाराष्ट्रात दमदार पाऊस; ऑस्ट्रेलियन हवामान विभागाचा अंदाज

बदलत्या वातावरणामुळे द्राक्षांना तडे जाण्याची भीती असते. हेच गेल्या आठ दिवसांपासून सुरु आहे. अगोदर ऊन आणि त्यानंतर अवकाळी यामुळे द्राक्षामध्ये गोडवा उतरण्याऐवजी द्राक्षाला तडे जाण्याचीच अधिकची भीती आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. शिवाय दर कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांचा हा डाव असल्याचाही आरोप काही द्राक्ष (grapes growers) बागायतदार शेतकरी करीत आहेत.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1