भारताने 2021-2022 या आर्थिक वर्षात 50 अब्ज डॉलर्स कृषी निर्यातीचे उद्दिष्ट गाठले असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने वृत्तसंस्थेला दिली आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचीही माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नक्की वाचा : भोंग्याचे राजकारण बंद करा, चना सुरळीत करा, यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे भोंगा आंदोलन
2013-2014 या आर्थिक वर्षात भारताच्या कृषी निर्यातीचे प्रमाण 43 अब्ज डॉलर्स एवढे होते. त्यानंतरच्या काळात देशाच्या कृषी निर्यातीचे प्रमाण घसरले होते. 2016-2017 या आर्थिक वर्षात कृषी मालाची निर्यात 10 अब्ज डॉलर्सवर येऊन ठेपली. या घसरणीमागे चार कारणे असल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या लक्षात आल्याचे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

हे वाचा : सदाभाऊ खोत यांच्या ‘जागर शेतकऱ्यांचा, अक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाला उद्यापासून सुरूवात
कृषी मालाच्या आयात आणि निर्यातीत ताळमेळ नव्हता. तसेच राज्य सरकार आणि शेतकऱ्यांनाही निर्यातक्षम उत्पादनाची संकल्पना लक्षात आली नव्हती. निर्यातीची व्याप्ती केवळ केंद्र सरकारापुरतीच सीमित होती, निर्यातीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे वाणिज्य मंत्रालयांच्या निदर्शनास आले. त्यानंतरच्या काळात वाणिज्य मंत्रालयाकडून या त्रुटी दूर करण्यावर भर देण्यात आला.
हे नक्की वाचा : ४ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली : कृषिमंत्री तोमर
कृषी निर्यात वाढवण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एक कृती आराखडा तयार केला. त्याच्या अंमलबजावणीला केवळ राज्यस्तरीयच नव्हे तर जिल्हा आणि गावपातळीवरील शेतकऱ्यांनीही प्रतिसाद दिल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी म्हटले आहे.
लक्षवेधी बातमी : इंडोनेशियाचा निर्यात बंदीचा निर्णय : खाद्यतेल अजून भडकणार
शेतकऱ्यांकडे अतिरिक्त उत्पादन असेल तर त्याच्या निर्यातीला प्राधान्य दिले पाहिजे, त्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करायला तयार असल्याचा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने विशेष जनजागृती अभियान राबवले.
आनंदाची बातमी : नाशिक येथे 2 मे रोजी कृषि पुरस्कारांनी 198 शेतकऱ्यांचा होणार सन्मान !
या अभियाना अंतर्गत शेतमाल निर्यात क्षेत्रातील अभ्यासकांनी, विशेषज्ञांनी गावपातळीवर जाऊन शेतकऱ्यांना निर्यातक्षम उत्पादनाचे मार्गदर्शन केले. उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने साठवणूक अशा सर्वच विषयावर शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
महत्त्वाची बातमी : शेतकरी आत्महत्येची धक्कदायक आकडेवारी आली समोर
विक्रेते, खरेदीदारांचे ऑनलाईन परिसंवाद, प्रशासकीय समन्वय, वाहतुक व्यवस्था, कापणीनंतरच्या पायाभूत सुविधांची उभारणी अशा सर्वच आघाड्यांवर हे अभियान राबवण्यात आले. केंद्रीय मंत्रालयाने राज्यांतील पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रातील संभाव्य शक्यता ओळखून त्यांच्या उभारणीसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला.

नक्की वाचा : सोलापुरातील किसान रेल्वे आठवड्यापासून बंद
गव्हाची निर्यातआजमितीस ज्या बाजारात भारतीय कृषी मालाची निर्यात होते आहे तिथला पुरवठा अधिक गतिमान करणे, भारतीय कृषी मालाला नव्या बाजारपेठा उपलब्ध कशा होतील, याचा शोध घेण्यात आला. यादरम्यान जगभरातील देशांच्या खाद्यान्न गरज ओळखून तशी यादी तयार करण्यात आली. या सर्व उपायांचा परिणाम म्हणून 2021-2022 या आर्थिक वर्षात भारताला विक्रमी अशी 50 अब्ज डॉलर्सची निर्यात करणे शक्य झाल्याचे वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
हे वाचा : उन्हाळ पिकांच्या लागवडीत 7 टक्क्यांनी वाढ
2021-2022 या आर्थिक वर्षात भारताने 10 अब्ज डॉलर्सचा तांदूळ विविध देशांना निर्यात केला आहे. हे प्रमाण जगभरातील तांदळाच्या एकूण निर्यातीच्या निम्मे भरते आहे. भारताने या वर्षी 8 अब्ज डॉलर्सची सागरी उत्पादने निर्यात केली आहेत. 4.5 अब्ज डॉलर्सची साखर निर्यात केली आहे. 2 अब्ज डॉलर्सचा गहू, 1 अब्ज डॉलर्सची कॉफी, 4 अब्ज डॉलर्सचे दुग्धजन्य पदार्थ, मांस, पोल्ट्री उत्पादने निर्यात केली आहेत तर ३ अब्ज डॉलर्सचा कापूस निर्यात केला असल्याचेही केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने नमूद केले आहे.
हे नक्की वाचा : ड्रोन फवारणीसाठी 477 कीडनाशकांना केंद्रांची मंजुरी

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1