साखर उत्पादनात भारत एक नंबरवर आहे. 15 वर्षापूर्वी मी फळबाग लागवडीच्या संबंधित प्रचार राष्ट्रीय पातळीवर होण्यासाठी फळबाग योजना आखली आता भारत हा जागात सर्वात जास्त फळांचे उत्पादन कराणारा देश झाला आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
मोठी बातमी : उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलले हिंगोलीतील शेतकऱ्याची पोलिसात तक्रार
नववर्षाच्या सुरूवातीला पवार यांनी इंदापूर तालुक्यातील ऊस आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देवून पहाणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करताना अनेक किस्से सांगितले. ते म्हणाले, मी अनेक देशात फिरतो, तेथे गेलो की तेथील बाजारात मी अवर्जुन जातो. तेव्हा मला त्या बाजारात भारातामधील फळे बघायला मिळतात. आज देशात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. विशेषत: मोठ्या प्रमाणात भारतातून द्राक्षाची परदेशात निर्यात केली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
साखर उत्पादनात भारत एक नंबरचा देश असल्याचे सांगून ते म्हणाले, ब्राझीलमधल्या लहान शेतकऱ्यांचा ऊस 50 हजार टन असतो. ब्राझीलमध्ये केवळ 6 ते 7 ऊस उत्पादक शेतकरीच कारखाना चालवितात. आपल्याकडे मात्र हजारो सभासद मिळून कारखाना चालविला जातो. यापूर्वी एकरी 100 टन पेक्षा जास्त आणि 50 कांडी ऊस मी पहायला नाही मात्र कळस येथील शेतकरी मधुकर खर्चे गेल्या अनेक वर्षापासून एकरी 100 टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन घेतात. त्यांच्याकडे 50 कांडी ऊस घेतला जातो त्याबद्दल त्यांनी खर्चे यांच्या ऊस शेतीला भेट दिल्यानंतर कौतुक केले.
ब्रेकिंग न्यूज : कोल्हापूर सांगलीला अलमट्टीचा वाढता धोका ?
एकेकाळी 86 टक्के लोक शेती करायचे आता तो आकडा 60 टक्क्यांवर आला असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील काही गाव अशी आहेत की त्या गाबांबद्दल मला आत्मयिता आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तेथील शेतकरी चांगली शेती करतात. मात्र आता तुमचे उत्पन्न सार्वजनिकरित्या सांगू नका, पत्रकार दाखवतील शेतकऱ्यांना येवढे पैसे मिळतात, मग दिल्लीतील लोक शेतकऱ्यांवर कर लावतील असे म्हणत पवार यांनी शेतकऱ्यांना सावध केले.
मोठी बातमी : खतांच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1