साखर उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक

0
854

साखर उत्पादनात भारताचा ब्राझील पाठोपाठ दुसरा क्रमांक आहे. गतवर्षीचा गाळप हंगाम हा 30 सप्टेंबर रोजी संपला होता. या हंगामात देशातील कारखान्यांनी 72. 3 लाख टन साखरेची निर्यात केली आहे.

देशात वर्षागणिक साखरेच्या उत्पादनात वाढ होत आहे. यंदा भारतातील साखर कारखान्यातून तब्बल 72. 3 लाख टन साखरेची निर्यात झालेली आहे. साखर व्यवसायात असलेल्या ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन या संस्थेने ही माहिती दिली आहे. तर साखर उत्पादनात भारताचा ब्राझील पाठोपाठ दुसरा क्रमांक आहे. गतवर्षीचा गाळप हंगाम हा 30 सप्टेंबर रोजी संपला होता. या हंगामात देशातील कारखान्यांनी 72. 3 लाख टन साखरेची निर्यात केली आहे.

ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या म्हणण्यानुसार 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या हंगामात भारताने इंडोनेशियाला सर्वाधिक साखर निर्यात केली आहे. सन 2020-21 मध्ये एकूण निर्यातीपैकी 70.6 लाख टन साखर निर्यात झाली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत सुमारे 1.5 दशलक्ष टन किंमतीचे निर्यात सौदे करण्यात आले आहेत. आगामी अधिवेशनात अनेक साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे भारतीय साखर कारखाने हे या संधीचा फायदा घेतील. शिवाय पुढील हंगामातही 60 लाख टनांपर्यंत साखर निर्यात देशातून होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 2020-21 या वर्षात सुमारे 60 लाख टन साखर सरकारी अनुदानासह आणि 7.85 लाख टन अनुदानाशिवाय निर्यात करण्यात आली. इंडोनेशियाला सर्वाधिक निर्यात 18.2 लाख टन असून त्याखालोखाल अफगाणिस्तानला (6,69,525 टन), संयुक्त अरब (यूएई) ला (5,24,064 टन) तर सोमालियाला (4,11,944 टन) निर्यात झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे थायलंडमध्येही साखरेचे उत्पादन हे वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यांचे उत्पादन हे वाढलेले आहे. असे असले तरी भारताच्या सर्वसाधारण उत्पादनाच्या 30 ते 35 लाख टन हे त्यांचे उत्पादन कमीच राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातही साखर निर्यात करण्यात भारतातील साखर कारखान्यांना मोठी संधी आहे. शिवाय थायलंडची साखर ही जानेवारी 2022 मध्ये बाजारात दाखल होणार आहे.

हेही वाचा :

असे करा आडसाली उसाचे खत व्यवस्थापन

असे करा आडसाली ऊस लागवडीचे नियोजन

कमी का येते ? सुरू उसाचे उत्पादन !

जाणून घ्या उसाच्या तूऱ्याचे महत्व

उत्पादनात घट झाल्याने जागतिक बाजारपेठेत साखरेची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्राझीलचे उत्पादन हे जगात सर्वाधिक असले तरी जानेवारी 2022 नंतर आणि एप्रिल 2022 नंतरच ब्राझीलची साखर बाजारपेठेत येणार आहे. त्यापुर्वी साखर निर्यातीचा फायदा हा भारतामधीलच साखर कारखान्यांना होणार आहे. वाढीव उत्पादनाबरोबरच साखरेची निर्यातही मोठ्या प्रमाणात होत असल्याने साखर कारखान्यांना अधिकचा फायदा होणार आहे.

हंगामाला 15 ऑक्टोंबरपासून सुरवात

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे ऊस गाळप 15 ऑक्टोंबरपासून सुरु होत आहेत. त्या अनुशंगाने गत महिन्यात मंत्रा मंडळाची बैठक झाली असून यामध्ये हा निर्णय झाला आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here