भरड धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, यंदा भारतातून जगातील 11 देशांना भरड धान्याची निर्यात केली जाणार आहे. विशेषत: पुढील एक वर्षासाठी जगातील विविध भागात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात देशातील निर्यातदार आणि शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.
महा ब्रेकिंग न्यूज : पुढच्या दोन दिवसात पुन्हा पाऊस !
अन्नधान्याच्या उत्पादनात इतर देशांच्या तुलनेत भारत आघाडीवर आहे. सध्या देशात गहू, मका, तांदळासह कडधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे भारताला परदेशात मोठ्या प्रमाणावर धान्याची निर्यात करण्याची संधी आहे. केंद्र सरकारच्या योजनेनुसार भारत जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये भरड धान्याची निर्यात करणार आहे.

यंदा भरडधान्याचे देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने भारत पूर्वेकडील देशांपासून पश्चिमेकडील देशांपर्यंत निर्यात करणार आहे. दक्षिण आफ्रिका, दुबई, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, सिडनी, बेल्जियम, जर्मनी, ब्रिटन आणि अमेरिका येथे भरड धान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांतर्गत परदेशात भरड धान्य प्रदर्शित केले जाईल. परदेशात भारतीय दूतावास स्थापन करण्यात आले आहेत. भरड धान्य विकण्याचे कामही दूतावास करणार आहेत. भरड धान्यांमध्ये बाजरी, नाचणी, ज्वारी आणि गहू यांचा समावेश आहे.
ब्रेकिंग न्यूज : आता पोल्ट्रीसाठी लागणार विशेष परवानगी !
संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष भरड तृणधान्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून आधीच घोषित केले आहे. जगातील 72 देशांनीही याला पाठिंबा दिला आहे. यावरुनच भरडधान्यांचे महत्त्व समजू शकते. गेल्या वर्षी झालेल्या निर्यातीबद्दल बोलायचे झाले तर भारताने यूएई, नेपाळ, लिबिया, ओमान, इजिप्त, ट्युनिशिया, येमेन, ब्रिटन, अमेरिका या देशांना मोठ्या प्रमाणात भरड धान्य निर्यात केले आहे.
मोठी बातमी : ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना पुन्हा एकदा सुरु

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1