पशुधनाचे संगोपन आणि पालनाकडे शेतकरी तर पाळीव प्राणी पालनाकडे शहरी नागरिकांचा कल वाढत आहे. या पशुधनाला अत्याधुनिक वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी शासन सर्वोत्तम सेवा देण्यासाठीचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यात सर्वोत्तम सुपरस्पेशालिटी रुग्णालय औंध येथे चांगली सेवा देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यास परवानगी दिल्यामुळे बैलांच्या किमती वाढल्या आहेत. दुधाचे दर वाढल्याने गाईंच्या किमती वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होत आहे. यावर अधिक संशोधनासाठी देशी गायी, म्हशी प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आवारातील अतिविशेषता (सुपर स्पेशिअलिटी) पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
महत्त्वाची बातमी : उसाप्रमाणे दूधच्याही एफआरपी संरक्षणासाठी आता देशस्तरावर संघर्ष
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते. यावेळी या दवाखान्यासाठी पुणे महापालिकेतर्फे आयुक्त विक्रम कुमार यांच्याहस्ते ३ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
हे नक्की वाचा : लवकरच कृषीपंपासाठी नवे विभागनिहाय धोरण लागू होणार !
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, शेळी समूह केंद्र अमरावती जिल्ह्यात उभारण्यात येत आहे. मासळी केंद्र देखभालीसाठी रुपये ५० कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पशुसंवर्धन महोत्सवासाठी ४०६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आनंदाची बातमी : राज्यात उद्या परवा पावसाची शक्यता
प्राण्यांपासून मानवास होणाऱ्या आजारांचे (झुनोटिक रोग) वाढते प्रमाण लक्षात घेता, हे आजार टाळणे व त्यांचे वेळीच निदान व उपचार करण्याबरोबरच पशुपालकांना आवश्यक सविस्तर मार्गदर्शन करणे ही आज काळाची गरज असून ती जबाबदारी या संस्थेद्वारे पार पाडण्यात येणार आहे. राज्यातील एकमेव पशुवैद्यकीय दवाखाना असल्याने याचा फायदा राज्यासह जिल्ह्यातील पशुधनाला आणि पयार्याने पशुपालक शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे श्री. पवार म्हणाले. येत्या काळात सर्व विभागात आवश्यक पदभरती करण्यास वित्त विभागातर्फे परवानगी देण्यात येणार आहे. विकासकामे करताना निधीची कमतरता पडू देणार नसल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
नक्की वाचा : अजित पवार म्हणाले…उसाचे टीपरुही शिल्लक राहणार नाही
पशुसंवर्धन राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, पशुधन विषयक सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. पुणे परिसरात जवळपास ४७ खासगी पाळीव प्राणी दवाखाने व ३ सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय दवाखाने उपलब्ध असून या मार्फत पशुवैद्यकीय सेवा दिल्या जातात. मात्र त्यांच्याकडून आकारले जाणारे शुल्क सर्वसामान्य पशुपालकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. या दवाखानाच्या माध्यमातून वाजवी शुल्क आकारून आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1