रशिया युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला असून, अनेक देशाचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. त्याचा मोठा परिणाम आयात-नियार्तीच्या पुरवठा साखळीवर झाला आहे. जगातील महागाई वरचे वर वाढत असतानाच इंडोनेशिया देशाने खाद्य तेलाच्या निर्यातीवर अचानक बंदी घातली आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे भाव अजून भडकणार अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.
आनंदाची बातमी : नाशिक येथे 2 मे रोजी कृषि पुरस्कारांनी 198 शेतकऱ्यांचा होणार सन्मान !

पाम तेलाच्या उत्पादनात इंडोनेशिया जगातील सर्वात जास्त निर्यात करणारा देश आहे. मात्र, स्थानिक पातळीवर सध्या तिथे या तेलाचा तुटवडा आहे. त्यामुळे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी येत्या २८ तारखेपासून पाम तेलासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्यात थांबवण्याची घोषणा केली आहे.
महत्त्वाची बातमी : शेतकरी आत्महत्येची धक्कदायक आकडेवारी आली समोर
भारततही खाद्य तेल बनवणाऱ्या कंपन्या असल्या तरी भारतला पाम तेलाची ६० टक्के आयात इंडोनेशियातून करावी लागते. जागतिक वनस्पती तेलाच्या निर्यातीपैकी एक ततीयांश वाटा इंडोनेशियाचा आहे. त्यामुळे इंडोनेशियाने निर्यात बंदीच्या निर्णयाचा फटका खाद्यतेल आयात करणाऱ्या देशांना बसणार आहे.
नक्की वाचा : सोलापुरातील किसान रेल्वे आठवड्यापासून बंद

इंडोनेशियातून मोठ्या प्रमाणावर खाद्य तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि भारत आघाडीवर आहे. भारतात तेलाच्या किमती आधीच वाढल्या आहेत आणि इंडोनेशियाच्या निर्यातबंदीमुळे भारतातील खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. भारतात खाद्यतेल २०० रुपये प्रति लिटर आहे.
हे वाचा : उन्हाळ पिकांच्या लागवडीत 7 टक्क्यांनी वाढ
युक्रेन हा सूर्यफूल तेलाचा प्रमुख उत्पादक आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. दक्षिण अमेरिकन देशांमध्ये दुष्काळामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. पामतेलाच्या टंचाईमुळे ग्राहकांना सोयाबीन, सूर्यफूल, मोहरी असे महागडे तेल घ्यावे लागत आहे.
हे नक्की वाचा : ड्रोन फवारणीसाठी 477 कीडनाशकांना केंद्रांची मंजुरी

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1