लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यातील हरभरा पिकावर काही ठिकाणी घाटे अळी, तर काही ठिकाणी ‘मर’चा प्रादुर्भाव आढळून आला असून, त्यामुळे हरभऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
खूशखबर : पीएम किसानचा 13 वा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार !
यंदा हवामानातील बदलाचा मोठा परिणाम हरभरा या पिकावर झाला असून, लातूर कृषी विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांत हरभरा पिकावर काही ठिकाणी घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
हरभरा हे घाटे अळीचे आवडते खाद्य असून, या किडीचा जीवनकाळ अंडी, अळी, कोष व पतंग अशा चार अवस्थेतून पूर्ण होतो. सध्या अळी अवस्था पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. सध्या लातूर कृषी विभागात या घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
लातूर कृषी विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांत हरभरा-पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 7 लाख 86 हजार 124 हेक्टर आहे. त्या तुलनेत यंदा 11 लाख 59 हजार 839 हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झालेली आहे. रब्बीचे पाचही जिल्ह्यांतील एकूण पेरणी झालेले क्षेत्र 16 लाख 79 हजार हेक्टर असून, त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र हरभरा पिकाने व्यापले आहे.
धक्कादायक : अमेरिकेने वर्तविला भारतीय मान्सूनबाबत हा अंदाज
सध्या हरभऱ्याचे पीक पक्वा अवस्थेत आहे. विभागातील सर्व पाचही जिल्ह्यांत हरभरा पिकावर काही प्रमाणात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर उपाययोजना कृषी विभागाकडून सुचविल्या जात आहेत. तसेच विभागातील सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी पिकावर अल्प प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
घाटेअळीपासून पिकाचे 30 ते 40 टक्के नुकसान होते. हे टाळण्यासाठी शेतक-यांनी जागरूक राहून पीक संरक्षण खर्चात बचत करण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापनाचा वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
महत्त्वाची माहिती : शाश्वत शेतीमध्ये सेन्द्रीये कर्बाचे महत्व
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1