महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरातील श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण मिळणार आहे.
ब्रेकिंग : यंदा अजब घडणार : मान्सून चंद्रपूरमार्गे येणार ?
प्रतीवर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या वारीमध्ये सुमारे 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ याची अंमलबजावणी, संनियंत्रण तसेच विमाहप्ता भरण्याची कार्यवाही शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येणार आहे. या संदर्भात आज वित्त विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.
वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून वारकऱ्यांना विमा छत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
गुडन्यूज : नक्की दोन दिवसात धो धो
यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी प्रत्येकी 35 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून देण्यात येईल.

ही विमा योजना खाजगी क्षेत्रातील विमा कंपनीच्या सहाय्याने राबविण्यात येणार असून, या विमा योजनेसंबंधीच्या अटी, शर्ती व अन्य तरतुदी शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत. तसेच या विमा योजनेबाबत आवश्यकतेनुसार विमा संचालनालयाचा सल्ला घेण्यात येईल, असे वित्त विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे.
महत्त्वाची बातमी : ऊसदरासाठी स्वाभिमानीचे 1 जुलैपासून आंदोलन

https://www.facebook.com/shetimitramagazine03













Users Today : 12
Users Last 30 days : 765
Users This Month : 90
Users This Year : 802
Total Users : 236251