सध्या राज्यात पाऊस पडण्यासाठी वाऱ्याची दिशा अनुकूल आहे. मात्र राज्यातील हवेच्या दाबात वारंवार बदल होत आहे. शिवाय सध्या बाष्पीभवनाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ढगनिर्मिती होण्यास अडचण येत आहे. एकूणच या वर्षी मान्सूनच्या पावसाला जोर नाही. त्यामुळेच सरासरीपेक्षा पावसाचे वितरण कमी राहण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे.
महा ब्रेकिंग : अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीस चांगल्या पावसाची शक्यता डॉ. साबळे यांनी व्यक्त केली असून, त्यांच्या मते, सध्या राज्यात दि. 2 व 3 रोजी हवेचा दाब 1004 हेप्टापास्कल इतका राहील. मंगळवारी (दि. 4) हवेचा दाब 1002 हेप्टापास्कल इतका कमी होईल. दोन दिवस तो तसाच राहील. गुरुवारी (दि. 6) महाराष्ट्राच्या उत्तर भागावर 1000 हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर 1002 हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. मंगळवार ते शुक्रवार (दि. 4 ते 7) या कालावधीत महाराष्ट्रावरील हवेचा दाब कमी होईल, त्या वेळीच पावसाचे प्रमाण चांगले राहणे शक्य आहे.

शुक्रवारी (दि. 7) महाराष्ट्राच्या उत्तर भागावर 1002 हेप्टापास्कल व दक्षिण भागावर 1004 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. शनिवारी (दि. 8) महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन पुन्हा तो 1006 हेप्टापास्कल इतका होईल. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईल. हवामान ढगाळ राहील तर वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहणार असण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
मोठी बातमी : राज्यातील 36 धरणे अद्यापही कोरडीच !
सध्या अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 29 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग मंदावला आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात ढगनिर्मिती होण्यास अडचण येत आहे. तसेच पावसासाठी वाऱ्याची दिशा अनुकूल होऊनही महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असल्याने पावसाचे प्रमाण सर्वसाधारणच राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
हिंदी महासागर, बंगालचा उपसागर व प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 31 अंश सेल्सिअस राहण्यामुळे सध्या तरी ‘एल-निनो’चा प्रभाव राहणार नसल्याचे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थान तसेच पंजाब व हरियानाच्या पश्चिम भागावर अद्याप मॉन्सून पोहोचला नसल्याचे सांगून त्यांनी यंदा एकूणच मॉन्सूनच्या पावसाला जोर नसल्याने सरासरीपेक्षा पावसाचे वितरण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान, त्यांनी चांगला पाऊस झाल्यानंतर जमिनीत 2 ते 3 फुटांपर्यंत खोलीवर ओल आल्यानंतरच पेरण्या कराव्यात, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.
हेही वाचा : हळदीच्या वायद्यांमध्ये मोठी तेजी

https://www.facebook.com/shetimitramagazine03