यंदा एक महिना आधी मान्सून येण्याची आशा लागलेल्या शेतकर्यांना जून महिन्यातही निराशा पत्करावी लागली. मात्र जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र चांगला आणि जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्यांची चिंता मिटली आहे. काही भागात सततच्या पावसामुळे अजून पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र पावसामुळे परिसरातील नदी-नाले भरून वाहू लागले आहेत. विशेषत: मराठवाड्यात यंदा विक्रमी पाऊस पडला असून, मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण 63 टक्क्याच्या वर गेले आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
आनंदाची बातमी : अमरावती येथील रविंद्र मेटकर यांना जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
परिसरात जोरदार पाऊस पडत असून, गोदावरी नदीपात्रातून प्रकल्पात सातत्याने आवक सुरूच आहे. पाच-सहा दिवसापासून नगर, नाशिक भागातील लहान मोठ्या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढतो आहे. असाच विसर्ग सुरू राहीला तर लवकरच हे धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. यदा पाऊस लांबल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. यामुळे आता दिलासा मिळाला आहे.
ब्रेकिंग न्यूज : उद्यापासून महागाई वाढणार ? काय काय महागणार ?
दरम्यान, गुरुवारी जायकवाडीत ४२ हजार २२३ क्युसेकने आवक सुरू होती. शुक्रवारी सकाळी ६ वाजता आवकेत पुन्हा वाढ होऊन ती ४७ हजार ९७० क्युसेकवर, तर दुपारी दोन वाजता ५१ हजार १११ क्युसेकवर पोहोचली होती. होत असलेली आवक पाहता पाऊस थांबला तरी घटत गेली तरी चार ते पाच दिवस आणखी ही आवक सुरूच राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे देखील सुरू राहणार आहेत.
यामुळे नगर, नाशिक भागांसह प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास आवकेत वाढ होणार आहे. यामुळे आता लवकरच हे धरण भरेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. राज्यातील अनेक प्रमुख धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत, तसेच अनेक धरणे ही भरली देखील आहेत.
आनंदाची बातमी : आठवड्यात उजनी २५ टक्क्यांवर
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1