केंद्र सरकाने शेतात ड्रोनच्या वापरास प्रोत्साहन दिले असून, ड्रोनचा शेतीमधील वापर वाढल्यास देशाच्या उत्पादनात वाढ होवून देशाचा जीडीपी एक ते दीड टक्क्यांनी वाढू शकतो. विशेषत: मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून, शेतीमधील खर्च वाचून शेतीमध्ये अमुलाग्र बदल होतील, असा दावा वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने केले आहे.
महत्त्वाची बातमी : आता उपग्रहाद्वारे होणार नुकसानीचे पंचनामे ?
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने याबाबतचा आपला अहवाल नुकताज जाहीर केला असून, ड्रोनच्या माध्यमातून स्वयंरोजगार आणि रोजगार निर्मितीही होवू शकते असे म्हटले आहे. ड्रोनचा वापर वाढल्यास यासंबंधीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध होवू शकतो. देशात तब्बल 5 लाख लोकांच्या हाताला काम मिळेल असेही अहवालात म्हटले आहे.

हल्ली लग्नसमारंभ, मोठ्या सभांसाठी ड्रोनचा वापर वाढला आहे. पण ड्रोनचा वापर एवढाच मर्यादीत नाही. ड्रोनचा वापर शेतात केल्यास लाखोच्या संख्येने रोजगार निर्मिती तर होईलच. पण खर्च वाचून शेतीत अमुलाग्र बदल होतील असा दावा करण्यात येत आहे. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या एका अहवालात याविषयीचा दावा करण्यात आला आहे.
आनंदाची बातमी : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 40.71 कोटींचा पीकविमा मंजूर
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अहवालानुसार, भारतीय कृषीसाठी ड्रोनचा वापर केल्यास कृषी क्षेत्रात पुन्हा एक क्रांती येऊ शकते. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने अदाणी समुहाच्या मदतीने हा अहवाल तयार केला आहे. त्यात कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदलासह रोजगार निर्मितीची बाब स्पष्ट करण्यात आली आहे. या अहवालात विविध संशोधनाचा आधार घेत भारतातील शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल होण्याचा दावा करण्यात आला आहे. तांत्रिक आणि आधुनिक यंत्राचा वापर करुन शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकते असा दावा करण्यात येत आहे.

महा ब्रेकिंग न्यूज : रविवारी परतीच्या पावसाचा बायबाय ?
अहवालानुसार, ड्रोन आणि तंत्रज्ञानाचा कुशल वापर केल्यास शेती क्षेत्रात 15 टक्के उत्पादन वाढू शकते. कृषी उत्पादन 600 अरब डॉलर होऊ शकते. हे लक्ष्य साध्य करण्यात ड्रोनचा मोठी मदत होईल. केंद्र सरकारने वेळीच या क्षेत्रात लक्ष्य घातल्यास ड्रोन आणि तत्सम उद्योगात 50 अरब डॉलर पर्यंत गुंतवणूक वाढू शकते असा दावा अहवालात करण्यात आला आहे. यामाध्यमातून भारतात येत्या काही दिवसात पाच लाख तरुणांना रोजागार मिळू शकतो.
मोठी बातमी : परतीच्या पावसाने द्राक्षबागा धोक्यात

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1