वांगी ही सर्वाना अवडणारी फळभाजी आहे. वागी पिकाच्या अधिक उत्पादनासाठी त्यावर पडणार्या रोगाचे नियंत्रण करणे महत्त्वाचे असते. त्यावर रोग पडल्यास अपसूकच वांग्याची उत्पादकता घटते. त्यामुळे वांगी पिकाच्या अधिक उत्पादनासाठी त्यावर पडणार्या रोगावर जास्त लक्ष द्यावे लागते. वेळीच नियंत्रण केल्यास वांगी पिकातून चांगला पैसा मिळवता येतो.
राज्यात असे काही शेतकरी आहेत की, ते वर्षेभर वांग्याचे उत्पादन घेतात. त्यांच्या अनुभवाच्या आधारे आपणही वांगी पिकात चांगले उत्पान्न मिळवू शकतो. विशेषत: वांग्याला बाजारात वर्षेभर चांगली मागणी असते आणि त्याला चांगला भावही मिळतो. मात्र त्यासाठी कीड नसलेल्या वांग्यालाच ग्राहक पसंत करतात त्यामुळे त्यावर पडणार्या रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वेळीच टाळता येईल असे व्यावस्थापन करणे गरजेचे असते.
1) वांगी रोप कुजणे : हा बुरशीजन्य रोग, वाफ्यावर रोप लहान असताना होतो. रोगग्रस्त रोपे कोलमडून पडतात. याच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टॉन किंवा बाविस्टिन हे बुरशीनाशक अडीच ते तीन ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळून पेरावे. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वाफ्यात रोपांची विरळणी करावी.
2) मर हा रोग जमिनीत वास्तव्य करून राहत असलेल्या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे झाडाची खालची पाने पिवळी पडतात. खोडाचा आतील भाग राखी रंगाचा होतो व झाडे फुले व फळे धरण्याच्या आधी मरतात. याच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिकारक जातीचा वापर करावा. पिकांची फेरपालट करावी. शेतात प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोगट झाडांच्या बुडाशी कॉपर ऑक्झिक्लोराईड तीन ग्रॅम प्रती लिटर पाण्यात घेऊन हे द्रावण मुळापर्यंत जाईल या बेताने जमिनीत झाडाभोवती ओतावे.
3) पर्ण गुच्छ किंवा पाने लहान होणे हा रोग फळवर्गीय पिकामध्ये फक्त वांगी पिकावरच आढळतो. हा रोग फायटोप्लाझमुळे होतो. आर्थिकदृष्ट्या वांगी पिकावरील हा महत्त् आहे. महाराष्ट्रात हळूहळू या रोगाचे प्रमाण वाढत आहे. या रोगाने पछाडलेल्या वांगी पिकाच्या रोपाची पाने एकदम लहान होतात. पानाचे देठ एवढे लहान होतात की, पाने खोडाला चिकटल्यासारखी दिसतात. पाने बारीक, मऊ आणि पिवळी पडतात. नवीन येणारी पाने त्याहूनही लहान असतात. यामुळे झाडाला झुडूपासारखा आकार येतो. झाडांची वाढ खुंटते लहान झालेली पाने फांदीवर गुच्छासारखी दिसतात. म्हणूनच याला पर्ण गुच्छ म्हणतात. पानावरील काटे नाहीसे होतात. झाडांना फळे लागत नाहीत. कारण फुलांचे रूपांतर हिरव्या पानात होते. रोगाची लागण उशीरा झालेली असल्यास, वांगी पिकांच्या काही फांद्या चांगल्या राहून त्यावर फळेही लागतात. अशा रोगट झाडाचे बी पुढे वापरली तरी हा रोग येत नाही; कारण फायटोप्लाझमा रोगाचा प्रसार बियापासून होत नाही.
याच्या नियंत्रणासाठी शेतात रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. या रोगाचा प्रसार विशिष्ट प्रकारच्या तुडतुडे किडीद्वारे होतो. या किडींचा उपद्रव टाळण्यासाठी लागवडीपूर्वी रोपांची मुळे 0.5 टक्के नुवाक्रॉन अधिक अग्रीमायसीन 0.5 टक्के औषधाच्या मिश्रणात बुडवून लागण करावी. शेतातील किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नुव्हॉक्रॉन 15 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोग प्रतिकारक जातींचा वापर करावा.
(संदर्भ : शेतीमित्र मासिक)
👇 शेतीमित्र मासिकाचे फेसबुक पेज लाईक करा 👇
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 शेतीमित्र मासिकाचे इन्ट्राग्राम पेज जॉईन करा 👇
https://www.instagram.com/shetimitra03/
👇 शेतीमित्रच्या टेलीग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हा ! 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा
👇 👇 👇