सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदायिनी ठरलेली किसान रेल्वे मागील आठवड्यापासून बंद असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गैरसोय तर होते आहेच, पण आर्थिक नुकसानही होत आहे. सांगोला स्टेशन वरून सुटणाऱ्या या शेतीमालवाहू गाडीतून एका फेरीत 250 टन शेतीमाल दिल्ली बाजारपेठेत जात होता. आज ही वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.
हे वाचा : उन्हाळ पिकांच्या लागवडीत 7 टक्क्यांनी वाढ
जिल्ह्यातून डाळिंब, द्राक्ष, केळी, पेरू, कांदा, लिंबू व भाजीपाला असा जवळपास पाचशे टन शेतीमाल आठवड्यातील दोन फेऱ्यांमधून दिल्लीस जात होता. परंतु मागील आठवड्यापासून अचानक किसान रेल्वेच्या फेऱ्या बंद झाल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. हा सर्व शेतमाल स्थानिक बाजारपेठेतच विक्री होऊ लागल्याने, येथील बाजारभावही कोसळले आहेत. यामुळे कायमस्वरूपी स्थानिक बाजारपेठेत शेतमाल विक्री करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला आहे.
हे नक्की वाचा : ड्रोन फवारणीसाठी 477 कीडनाशकांना केंद्रांची मंजुरी
पेरू, डाळिंब, द्राक्षाचे भाव सरासरी 15 ते 20 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. एका आठवड्यातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साधारणपणे एक कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. कुर्डुवाडीहून दिल्लीसाठी शेतीमालास सर्वसाधारणपणे अडीच रुपये प्रति किलो भाडे आकारले जाते. तेच भाडे रस्ते वाहतुकीस डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे दहा रुपये प्रति किलोपर्यंत आहे. शिवाय द्राक्षासारख्या नाशवंत मालाचे रस्ते वाहतुकीत मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
हे वाचा : रोजगार हमीसाठी गावपातळीवर स्वतंत्र यंत्रणा ?
शेतकऱ्याच्या मालाला उठाव होण्यासाठी तातडीने किसान रेल्वे पूर्ववत सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान, रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, रेल्वेने कोळसा वाहतूक सुरू झाली आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या गाड्यांना मार्ग देण्यासाठी किसान रेल्वे तूर्त बंद करण्यात आल्या आहेत, लवकरच किसान रेल्वेची सेवा सुरळीत सुरू होईल. अशी माहिती देण्यात आली.
महत्त्वाचे वृत्त : रायगड जिल्ह्यातील 26 हजार लोक पीएम किसानसाठी अपात्र
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1