शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नावरुन महाराष्ट्र राज्य किसान सभा चांगलीच आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या विविध मागण्यासंदर्भात येत्या सोमवारी, दि. 26 डिसेंबर रोजी नागपूर विधिमंडळावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेचे नेते राजन क्षीरसागर यांनी दिली असून, या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेतमजुरांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हे नक्की वाचा : स्वावलंबनासाठी शेतीसोबत जोडव्यवसायाचे ज्ञान आवश्यक : राज्यपाल
यासंबंधीचे एक पोस्टर देखील त्यांनी प्रकाशीत केले असून, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पुरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, गायरान धारकांच्या हक्कासाठी तसेच वनजमिनींच्या पट्यासाठी हा मोर्चा निघणार आहे. लुटारु पीक विमा कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत. तांदूळ आणि सोयाबीन पिकांत्या रास्त हमाभावासाठी तसेच बोनस मिळवण्यासाठी, प्रगल्पग्रस्तांच्या हक्कासाठी तसेच भुसंपादनाच्या मावेजासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना मोटार पाईप लाईन तसेच दिर्घ मुदतीचे कर्ज मिळावे, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्ज माफी मिळावी, शेतीसाठी दिवसाची वीज मिळावी, शेतकऱ्यांना संपूर्ण वीज बिल माफ करावे, वन्य पशुमुळे होणारी मनुष्यहानी तसेच पीकहानी बंद करण्यासाठी उपाययोजना करावी, घरकुलासाठी वाढीव अनुदान अशा विविध शेतकरी आणि शेतमजुरांच्या मागण्या आहेत. या मागण्यासाठी नागपूर विधिमंडळावर हा शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोठी बातमी : राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी पी. आर. पाटील यांची वर्णी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1