हरभऱ्याची नाफेडकडून 5 हजार 230 रुपये या हमीभावाने सुरु असलेली खरेदी अचानकपणे थांबवल्याने राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरम्यान केंद्र सरकारने हरभरा खरेदी पुन्हा सुरु करावी, राज्य सरकारनेही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबाबत योग्य पावले उचलावीत, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचे आंदोलन केले जाईल, असा इशारा किसान सभेच्या अजित नवले यांनी दिला आहे.
हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्राला 29 मे पर्यंतची मुदत आहे. मात्र उद्दिष्ट पूर्ण झाल्याने नाफेड आणि एफसीआय या एजन्सीच्या माध्यमातून नाफेड हमीभाव खरेदी केंद्रात खरेदी केल्या जाणाऱ्या हरभऱ्याची खरेदी अचानकपणे 23 मे रोजी थांबवली आहे. खरेदी 29 मे रोजी बंद होणार होती परंतु कोणतीही सूचना न देता खरेदी बंद केल्याने शेतकरी त्याचबरोबर नाफेड हमीभाव खरेदी केंद्रातील संचालक यांची मात्र चांगलीच तारांबळ झाली आहे.
मान्सून अपडेट : पुढच्या 72 तासांत मान्सून केरळमध्ये
हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने अचानक हमीभावाने हरभरा खरेदी करण्याचे काम थांबवण्यात आले. यामुळे चांगल्या प्रतीचा हरभरा बाजारात विकण्यासाठी गेल्यास हमीभावापेक्षा कमी दरात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांची द्विधा अवस्था झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने हरभरा खरेदी पुन्हा सुरु करावी, राज्य सरकारनेही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबाबत योग्य पावले उचलावीत, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा किसान सभेच्या अजित नवले यांनी दिला आहे.

याबाबत बोलताना नवले म्हणाले की, हरभरा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करुन दिलेल्या मुदतीपूर्वीच नाफेडने हरभरा खरेदी बंद केली आहे. हरभरा उत्पादक शेतकरी सरकारच्या या कृतीमुळे हवालदिल झाले आहेत. राज्यभर खरेदी केंद्रांवर हजारो वाहने उभी असताना अचानक खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. वाहनांचे भाडे दररोज वाढत असून नाईटचार्ज भरावा लागत आहे. आपला हरभरा खरेदी होईल याची शाश्वती नसल्याने शेतकरी काकुळतीला आल्याचे किसान सभेचे नेते नवले म्हणाले.
महत्त्वाची बातमी : नांदेडमध्ये बोगस बियाणे कंपनीवर छापा
राज्यात नाफेडद्वारे 5 हजार 230 रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरु होती. खुल्या बाजारात 4 हजार 200 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विकण्याचा पर्याय निवडला होता. नाफेडकडे रीतसर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एस.एम.एस. पाठवण्यात आले होते. रीतसर एस.एम.एस. आलेल्या शेतकऱ्यांनी वाहने भाड्याने करुन आपला माल खरेदी केंद्रांवर आणला असताना आता खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण सांगून खरेदी नाकारली जात आहे.
दरम्यान, याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, या हंगामात हरभऱ्याच्या एकरी उत्पादनात वाढ झाली असून 32.83 लाख मे. टन अपेक्षित उत्पादन असताना 8.20 लाख मे. टन एवढे वाढीव उत्पादन होत आहे. यामुळे हरभऱ्याची खरेदी 28 जून 2022 पर्यंत वाढविण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करण्यात आली आहे. शिवाय त्याचा पाठपुरावाही करण्यात येत आहे. हरभऱ्याच्या खरेदीचा अंतिम दिनांक 29 मे 2022 असून ही तारीख वाढविण्यास एक-दोन दिवसात मंजूरी अपेक्षित आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
मान्सून अपडेट : विश्रांती संपली : मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1