सध्या सर्व भागात ऊसतोड चालू आहे जे की उसाचे फड रिकामे झाले की शेतकरी पाचट पेटवून देतो आणि खोडवा उसाची तयारी लगेच चालू करतो परंतु पाचट न पेटवता तुम्ही ते जमिनीत कुजवले तर जमिनीचे आरोग्य सुधारते यामुळे उत्पादनही चांगल्या प्रकारे निघते. पाचट कुजवल्यानंतर पर्यावरणाचे संवर्धन तर होणार आहेत त्याच बरोबर जमिनीची सुपीकता सुद्धा वाढणार आहे.
पिकांच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणे फायदेशी पिकांच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणे फायदेशीर ठरते. रासायनिक खतांच्या मर्यादा व सेंद्रिय खतांचे फायदे लक्षात घेता पिकास निव्वळ रासायनिक खते न देता त्याबरोबर आपल्याच शेतात तयार होणारी सेंद्रिय खते देणे हे गरजेचे झाले आहे. अलीकडे बागायती क्षेत्र वाढल्यामुळे रासायनिक खतांचा वापर भरपूर वाढला आहे. दिवसेंदिवस शेणखत व कंपोस्ट खते उपलब्ध होत नाहीत.
पाचटातील नत्र आणि स्फुरदाचा 90 टक्क्यांहून अधिक भाग जळून जातो, केवळ पालाश काही प्रमाणात शिल्लक राहते. परंतु अजूनही ऊस उत्पादक शेतकरी उसाचे पाचट मोठ्या प्रमाणात जाळून होणाऱ्या नुकसानीमध्ये भर घालत आहेत. महाराष्ट्रात जवळजवळ 40 ते 45 टक्के क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या खोडव्यापैकी पाचटाचा वापर मात्र 1 टक्के क्षेत्रावरही होत नाही. हे थांबविण्यासाठी पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राने उसाच्या पाचटाचे व्यवस्थापन करण्याचे तंत्र विकसित केले आहे. साधारणपणे एक हेक्टर उसाच्या क्षेत्रामध्ये 8 ते 10 टन पाचट मिळते, हे जाळून न टाकता त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
पाचट जाळल्यामुळे होणारे तोटे : पाचट जाळल्यामुळे सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा नाश होतो. जमीन तापल्यामुळे नत्र व इतर अन्नघटकांचा थोड्याफार प्रमाणात वायुरुपात नाश होतो. जमीन भाजल्यामुळे पाचट जाळल्यामुळे 100 टक्के नत्र व 75 टक्के इतर अन्नघटक वाया जातात. पाचटावर असलेले मित्रकीटक यांचा सुध्दा नाश होतो. तसेच धुरामुळे वातावरण सुद्धा प्रदूषित होते.
पाचट कुजवण्याचे फायदे : पाचट शेतात कुजवले तर वेगळे सेंद्रिय खत घालण्याची गरज पडत नाही. कारण पाचटाद्वारे हेक्टरी 4 ते 5 टन सेंद्रिय खत मिळते. शेतात पाचट तसेच ठेवल्यास त्याचा आच्छादन म्हणून उपयोग होतो. परिणामी पाण्याची चांगलीच बचत होते. पाचटामुळे तणांची वाढ होत नाही. नैसर्गिक तण नियंत्रण होते. आणि महत्त्वाचे म्हणजे हिरवळीच्या किंवा शेणखतासाठी होणार्या खर्चामध्ये बचत होते. जर या पाचटची कुटी करून जर तुम्ही जमिनीत कुजवली तर जमिनीची पोत सुधारते. उन्हाळ्यात पाण्याचे जे बाष्पीभवन होते ते सुद्धा यामुळे रोखले जाते त्यामुळे पाण्याची बचतही होते. पाचट कुजवल्याने उसामध्ये पुन्हा तण ही लवकर येत नाही. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी गांडूळ खत सुद्धा वापरले जाते.
एक हेक्टर जमिनीतून कमीत कमी 8 ते 10 टन तर पाचट मिळतेच जे की, या पाचटीमधून 0.5 टक्के नत्र, 0.2 टक्के स्फूरद, 1 टक्का पालाश तर 32 ते 40 टक्के सेंद्रिय अर्ब मिळते. म्हणजेच पाचटीमधून 40 किलो नत्र
सेंद्रिय शेतीमध्ये निंबोळी पेंडीचे फायदे
तसेच 20 – 30 टक्के स्फुरद आणि 75 – 100 किलो पालाश मिळते. हे घटक भेटल्याने जमिनीची पोत तर सुधारते तसेच उत्पादन ही चांगल्या प्रकारे निघते. उसाची पाचट जाळल्याने वातावरणाचे प्रदूषण तर होते त्यापेक्षा न जाळता कुजवली तर जमिनीची सुपीकता वाढवते आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होतो.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
👇👇👇 असे करा आडसाली उसाचे खत व्यवस्थापन 👇👇👇
👇👇👇 सेंद्रिय शेतीमध्ये निंबोळी पेंडीचे फायदे 👇👇👇
👇👇👇 गांडूळ खताचे महत्त्व 👇👇👇
👇👇👇 काय आहे माती परिक्षणाचा मुलमंत्र ? 👇👇👇
👇👇👇 पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करा गांडुळ खताचा वापर 👇👇👇
👇👇👇 पीक संरक्षणात विविध अन्नद्रव्यांचे कार्य 👇👇👇
असा करा पाचटाचा वापर : उसाची तोडणी केल्यानंतर जी पाचट राहते ती जाळून तसेच फेकून न देता ज्या क्षेत्रावर उसाची लागवड करणार आहे त्या ठिकाणी पसरावे. मशीनच्याद्वारे पाचट ची कुटी करून ती कुजवण्यासाठी त्यावर युरिया आणि सल्फेट फॉस्फेट खत टाकून पाणी द्यावे. हे सर्व झाल्यानंतर छोट्या ट्रॅक्टर च्या साहाय्याने रोटाव्हेटर फिरवल्याने पाचट जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळते तसेच उसाला मातीची भर देणे गरजेचे आहे. किंवा यादव पाटील अॅग्रो इंडस्ट्रिजचे भू-रत्न वापरून 21 दिवसात पाचटाचे कंपोस्ट खत तयार करा. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी (7722027255) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा