जाणून घ्या स्लरीचे फायदे अन् बानविण्याची पद्धत !

0
1690

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या स्लरीमुळे सर्वच पिकांना चांगला फायदा होतो. स्लरीच्या वापरामुळे शेतजमिनीमधील सूक्ष्म जिवाणू क्रियाशील होतात. सूक्ष्म जिवाणूनां उर्जा मिळते. या जिवाणूंमुळेच जमिनीमधील अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होत असतात. स्लरीचे अनेक फायदे होतात.

प्रामुख्याने मुख्य अन्नद्रव्यांची स्लरी, सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्लरी, जिवाणूंची स्लरी व कडधान्य स्लरी असे स्लरीचे प्रकार पडतात. या स्लरी बनविण्याची पद्धतही वेगळी असून, त्याचे फायदे मात्र एकसारखे आहेत. स्लरीचे शेतीमध्ये वापर केल्याने पिकांचे उत्पादन वाढतेच शिवाय जमिनीची सुपीकता वरचेवर वाढत जाते.

मुख्य अन्नद्रव्यांची स्लरी : या स्लरी मुळे रासायनिक खते पिकांना लवकर लागू होतात व त्यांची कार्यक्षमता वाढवते. पिकांच्या पांढऱ्या मुलींची भरपूर वाढ होते तसेच मुख्य अन्नद्रव्य आतील स्फुरदाचे स्थिरीकरण कमी करण्यास मदत होते व नत्राचे बाष्पीभवन होत नाही.

स्लरी बनवण्याची पद्धत : यामध्ये साधारण तीनशे ते साडेतीनशे फळझाडांसाठी ताजे शेण वीस किलो, जनावरांचे मूत्र दहा लिटर, निंबोळी पेंड 15 किलो, युरिया पाच किलो, सिंगल सुपर फॉस्फेट दहा किलो, पोटॅश 5 किलो आणि 200 ते 250 लिटर पाणी या पद्धतीने मुख्य अन्नद्रव्याचे स्लरी  बनवावी व साधारण  महिन्यातून एकदा तरी प्रति झाड एक लिटर या प्रमाणात वापरावी.

सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरी : ही स्लरी मुख्यता झिंक व फेरस हे जमिनीमध्ये असेच दिल्यास ते पिकाला पूर्णतः आनू लागता जमिनीत दुसऱ्या फार्ममध्ये स्थिर होतात. म्हणून शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून देत असताना स्लरीचा स्वरूपात द्यावे. त्यासाठी ताजे सेन 20 किलो, जनावरांचे मूत्र दहा लिटर, निंबोळी पेंड 15 किलो, झिंक सल्फेट पाच किलो, फेरस सल्फेट तीन किलो, मॅग्नीज दोन किलो, कॉपर सल्फेट 100 ग्रॅम व बोरॉन 30 ग्रॅम

दुय्यम अन्नद्रव्य स्लरी : ही स्लरी बनवतांना ताजे शेण वीस किलो, जनावरांचे मूत्र दहा लिटर, निंबोळी पेंड 15 किलो, कॅल्शियम 15 किलो, मॅग्नेशियम पंधरा किलो, गंधक दहा किलो आणि पाणी 200 ते अडीचशे लिटर घ्यावे. ही स्लरी दिवसातून दोन वेळेस चांगली ढवळावी. सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य स्लरीमध्ये दहा ते 12 दिवसांचे अंतर ठेवावे.

हेही वाचा :

काय आहे माती परिक्षणाचा मुलमंत्र ?

कशी आहे ? गांडूळ खत निर्मितीची आधुनिक पद्धती

पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करा गांडुळ खताचा वापर

पीक संरक्षणात विविध अन्नद्रव्यांचे कार्य

जिवाणू स्लरी : नत्रयुक्त जिवाणू स्लरीमुळे हवेतील नत्र शोषून आले जाऊन ते पिकांना उपलब्ध करून दिले जाते. अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध करून दिले जाते. सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन होते. बियाण्यांच्या उगवण क्षमतेमध्ये वाढ होते. पिकाची वाढ जोमदार होते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते व जमिनीचा पोत सुधारतो. रासायनिक खतांवरील खर्च कपात होतो.

जिवाणू स्लरी बनवण्याची पद्धत : ताजे शेण 20 किलो, जनावरांचे मूत्रदहा लिटर, काळा गूळ दोन किलो, अझोटोबॅक्टर पाचशे ग्राम, फोस्फेट सोलुब्लिसिंन्गमायक्रो ऑरगॅनिझम 500 ग्राम, पोटॅश मोबिलीझर 500 ग्रॅम, इ एम द्रावण एक लिटर व इतर जैविक बुरशीनाशके एक किलोग्राम व 200 ते 250 लिटर पाणी शक्यतो जैविक खते व बुरशीनाशक एकत्र वापरू नयेत.

कडधान्य स्लरी : एक एकर क्षेत्रासाठी कडधान्याची स्लरी ताजेशेण 20 किलो, जनावरांचे मूत्र दहा लिटर, ह्युमिक अ‍ॅसिड व वर्मी वाश दोन लिटर, भरडा कडधान्य प्रत्येकी एक किलो मुग, मठ, चवळी, हरभरा, मसूर, वाटाणा, उडीद, इ एम द्रावण दोनशे लिटर ते 250 लिटर पाणी

टीप : वरील सर्व स्लरी द्रावण पाच ते सहा दिवस ठेवायचे. दिवसातून दररोज सकाळी दोन मिनिट हलवायचे व सातव्या दिवशी वापशावर जमिनीतून पिकाला ड्रेचींग करावी.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Click to rate this post!
[Total: 1 Average: 1]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here