यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस

0
347

स्कायमेटच्या हवामान अंदाजानंतर सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेला भारतीय हवामान विभागाने आपला दिर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. त्यामध्ये यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

चिंताजनक : स्कायमेटकडून मान्सूनचा चिंताजनक अंदाज

दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज जाहीर झाला आहे. दरम्यान हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. 

भारतीय हवामान विभागाकडून यंदा देशात जून ते सप्टेंबर दरम्यान 835 मिमी म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्वसाधारण 96 ते 104 टक्क्यांच्या दरम्यान होणाऱ्या पावसाला सामान्य पाऊस म्हटले जाते. दरम्यान, देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी असली तरी महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काळजी लागून राहिलेली आहे.

मोठी बातमी : अवकाळी पावसाचा पुन्हा तडाका : नाशिक भागातील द्राक्षबागा भुईसपाट

हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या अशा पाच श्रेणी ठरवल्या आहेत. त्यानुसार 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो. यंदाच्या हंगामात तिसऱ्या श्रेणीतील पावसाचे भाकीत करण्यात आले आहे.

सध्या वर्तवण्यात आलेला दीर्घकालीन अंदाज एप्रिलच्या सुरुवातीला असलेल्या वातावरणातील स्थितीच्या आधारावर देण्यात आला आहे. हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी अलीकडच्या काळात अत्याधुनिक प्रारूपे तयार करण्यात आली आहेत. त्यात वाऱ्यांची दिशा, अवकाश, समुद्राची स्थिती आदींचा सातत्याने अभ्यास केला जातो. त्यासाठी हवामान केंद्रांसह उपग्रह, रडार यंत्रणा यांचा आधार घेतला जातो. हंगामाच्या कालावधीत ही स्थिती कशी राहील, याचा अंदाज प्रारुपांच्या आधारे मांडला जातो आणि त्यावरुन त्या काळातील हवामानाची आणि पावसाची भाकिते केली जातात.

चिंताजनक : मराठवाड्यात 9 ठिकाणी वीज कोसळून 5 जणांचा बळी : 31 जनावरे दगावली

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here