भोंग्याच सोडा शेतकऱ्यांच्या विजेचं बघा असा उपरोधिक सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. तुळजापूर येथील सर्किट हाउसवर शेट्टी पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, दुरवास भोजने, धनाजी पेंदे आदी उपस्थित होते. बळिराजा हुंकार यात्रा सोलापूर जिल्ह्यात आहे. तथापि, श्री. शेट्टी हे तुळजापूर येथे येऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले.
नक्की वाचा : फळबागांमध्ये आंबा लागवडीलाच प्राधान्य
श्री. शेट्टी पुढे म्हणाले, की शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या केंद्रातील सरकारकडे आपला जाण्याचा प्रश्नच नाही. राज्यातील आणि केंद्र सरकारमधील विविध प्रश्नांवर त्यांनी टीका केली. १ मेपासून गावसभा घेऊन राष्ट्रपतींकडे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी निवेदन दिले जाणार आहे. शेतकरी भारनियमनाने त्रस्त आहे. रात्रीची वीज देऊन शेतकऱ्यांच्या मानवी हक्काची पायमल्ली होते. मागील पाच वर्षांत रात्रीच्या विजेमुळे किती शेतकऱ्यांचे मृत्यू झाले याची माहिती ही गोळा करण्यात येणार आहे. ‘हमीभाव कायदा करावा’ अशीही आमची मागणी आहे, असे त्यांनी सांगितले.
आनंदाची बातमी : जातिवंत शेळ्यांच्या पैदाशीसाठी राज्यात तीन हजार कृत्रिम रेतन केंद्रे उघडणार
कोळशाच्या प्रश्नाबाबत विचारले असता ते म्हणाले, की कोणताही उद्योग कोळशा अभावी बंद आहे असे आपण ऐकलेले नाही. तसेच उसाच्या प्रश्नाबाबत राज्य सरकार जबाबदार आहे. ऊस किती शिल्लक आहे. त्याचे क्षेत्र किती आहे. याबाबत राज्य सरकारने नियोजन करणे आवश्यक होते. तसेच विरोधी पक्ष विरोधकांसारखे वागत नाहीत. तसेच सत्ताधारी ही तसे वागत नाहीत. विरोधकांना आपण दिल्लीत सत्तेवर असल्याने त्यांच्या चुका समोर येतील, असे वाटते तर महाविकास आघाडीच्याही सरकारबाबत त्यांनी टीका केली.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1