लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पी स्किन आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना जनावरांना लम्पीची लागण होत असल्याने पशुपालकांची मात्र चिंता वाढली आहे.
आनंदाची बातमी : 14 ऑगस्टला लातूरमध्ये सोयाबीन परिषद : कृषीमंत्री सत्तार
चालू वर्षात मार्च महिन्यापासून आतापर्यंत सुमारे एक हजार 236 जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 145 लम्पीग्रस्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात जनावरांमध्ये लम्पी रोगाची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्याचे समोर आले होते. या रोगामुळे हजारो जनावरांचा मृत्यू झाला होता.
लम्पीच्या नियंत्रणासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनावरांच्या लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली होती. मात्र, आता जनावरांमध्ये पुन्हा एकदा या रोगाची लक्षणे दिसण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे.
ब्रेकिंग : 8 जूनला राज्यात मान्सूनची दमदार हजेरी : पंजाबराव डख
राज्यात लम्पीच्या नियंत्रणासाठी जनावरांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले होते. यानंतर हा रोग नियंत्रणात आल्याचा दावाही केला जात होता. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध भागात जनावरांध्ये पुन्हा एकदा लम्पीची लक्षणे दिसायला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी तर या रोगामुळे जनावरांचा मृत्युही झाला आहे.
गेल्यावर्षी आलेल्या लम्पीच्या पहिल्या लाटे दरम्यान लातूर जिल्ह्यातील अनेक भागात जनावरांच्या लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली होती. मात्र, यावर्षीच्या मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील काही भागांमध्ये जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. लम्पीच्या पहिल्या लाटेत लसीकरण करण्यात आलेल्या जनावरांमध्ये प्रादुर्भाव दिसून येत नाही. मात्र, लसीकरण न झालेल्या जनावरे लम्पीमुळे मृत्युमुखी पडत आहे. ज्यात वासरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
मोठी बातमी : राज्यात पुढील तीन दिवसात पाऊस !
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळमध्ये जनावरांना लम्पीचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षीच्या सप्टेंबरपासून शिरूर अनंतपाळमध्ये 702 जनावरांमध्ये लम्पीची लागण झाली असून यापैकी 64 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मात्र, योग्यवेळी उपाचार मिळाल्यामुळे 537 जनावरे आजारातून बरी झाली आहेत. अद्यापही 101 जनारांवर उपचार सुरू असल्याचे पशु चिकित्सकांनी सांगितले आहे.
फायद्याची माहिती : एनएमके-1 सिताफळाला आता छाटणीनंतरच पाणी द्या : डॉ. कसपटे
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1