यंदा जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सध्या राज्यातील काही भागात मका पिकावर लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. मराठवाड्यासह पुणे, सोलापूर, नाशिक, अहमदनगर आणि बुलढाणा जिल्ह्यातील मका पिकावर लष्कळी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अतिवृष्टीने हैराण झालेले शेतकरी लष्करी अळीमुळे पुन्हा संकटात सापडले असून त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा लेख वाचा : मका पिकावरील किडींचे असे करा व्यवस्थापन
दरम्यान सततच्या पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या तणची समस्या समोर असताना आता लष्करी अळीचे संकट उभे राहिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टीतून कसेबटे वाचलेले मक्याचे पीक आता लष्कळी अळी फस्त करीत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना महागडी औषध फवारणीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
फायद्याचा लेख : गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी या बाबी लक्षात घ्या !
लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे आता शेतकऱ्यांना खते, बियाणे, मजुरीची रक्कम देण्याआधीच कीटकनाशकांची खरेदी करण्याची वेळ आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे; अशा शेतकऱ्यांनी लवकर मका लावली आहे. काहींनी पुढील पीक घेण्याच्या दृष्टीने लवकरच मकेची लागवड केली आहे. त्यामुळे बहुतांश शेतात मक्याचे पीक चांगले वाढले आहे. अशा अवस्थेमध्ये पानांवर आणि पोग्यात लष्करी अळी दिसू लागल्याने शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. मागीलवर्षी असेच लष्करी अळीचे आक्रमण झाल्याने मका पिकाचे मोठे नुकसान झाले होते.
लष्करी अळीचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने वेळीच याचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचे वेळीच नियंत्रण न केल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
नक्की वाचा : ज्वारी पिकाचे रोग व नियंत्रण
जैविक उपाय (प्रती 10 लीटर पाणी) रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था (5 ते 10% प्रादुर्भावग्रस्त झाडे), निंबोळी अर्क 5%, अझाडीरॅक्टीन 1500 पीपीएम 50 मिली, मेटा-हायझियम ॲनिसोप्ली 50 ग्रॅम, मेटा-हायझियम (नोमुरिया) रिलाई 50 ग्रॅम, बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती 20 ग्रॅम, रासायनिक उपाय (प्रती 10 लीटर पाणी) यापैकी एक पर्याय वापरावा.
रासायनिक किटकनाशकांचे अवशेष मका पिकामध्ये जवळजवळ 30 ते 58 दिवस राहतात म्हणून मका हे चारा पीक म्हणून घेताना रासायनिक किटकनाशकांची फवारणी करु नये. क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल 18.5% एससी 4 मिली, स्पिनेटोराम 11.7% एससी 5 मिली, थायोमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5% झेडसी 2.5 मिली याप्रमाणे औषध पोंग्यात पडेल याची दक्षता घ्यावी, भैतिक उपाय पोंग्यामध्ये वाळु व चुना यांचे 9.1 मिश्रण करुन टाकावे.
महत्त्वाची माहिती : असे करा भातावरील किडीचे प्रभावी व्यवस्थापन
1) शेताला रोजच्या रोज भेट देऊन पिकाचे निरीक्षण करावे.
2) किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रण उपायांचा अवलंब करावा.
3) शेताच्या बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत.
4) पिकाच्या पानांवरील अंडीपुंज, समुहातील लहान आणि मोठ्या अळया हाताने वेचून रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
5) सामुहिकरित्या मोठ्या प्रमाणात नर पतंग लिंग प्रलोभन सापळ्यामध्ये आकर्षित करुन मारावेत.
6) किडीच्या सर्वेक्षणासाठी प्रती एकरी 15 लिंग प्रलोभन सापळे लावावेत.
7) मक्याच्या शेतात हेक्टरी 20 ते 25 पक्षी थांबे लावावेत.
8) बेडकांचे शेतात संवर्धन, संरक्षण करावे. कारण बेडूक या किडीच्या अळ्या खातो.
9) पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर 4 ते 5 अळ्या प्रति चौ. मी. आढळल्यास सायंकाळच्या सुमारास वारा शांत असताना डायक्लोरव्हॉस (76 टक्के प्रवाही) 2.5 लिटर किंवा क्लोरोपायरीफॉस (20 टक्के प्रवाही) 2.5 लिटर प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून त्याची एक हेक्टर क्षेत्रावर फवारणी करावी.
फायद्याची गोष्ट : पीक संरक्षणात विविध अन्नद्रव्यांचे कार्य
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1