केळीचे शास्त्रीय नांव मुसा पेंराडिसीएका (Musa paradisica) असून, कुळ मुसासीड (कर्दळी) आहे. केळीची विशेषत: एकदलीय, मऊ खोडाचे झाड, कंदापासून लागण, मांसल मुळे, उष्णदेशिय वनस्पती अशी आहे. टीआर केळीचे उपनाम कर्दळी, केला, केळी, रंभाकर्दळी, बनाना असे आहे.
केळी खाण्यासाठी सर्वात लाभदायक असतात. यांपासून अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. हे एक बहुगुणी फळ आहे; ज्यामध्ये अनेक पोषके आणि ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘इ’ ही जीवनसत्वे आहेत. तसेच पोटयाशियम, झिंक, लोह आणि मेग्नीज ही खनिजे आहेत. केळी खाल्ल्याने आपले आरोग्य स्वस्थ व त्वचा नरम राहते. कच्या फळात टॅनीन व स्टार्च विपूल प्रमाणात असते. केळी पिकापासून ७९ कॅलरीपर्यंत उष्णता मिळू शकते. केळीचे फळ मधूमेह, संधीवात मूत्रपिंड, दाह, हृदयविकार, अमांश व पोटातील कृमी आणि जंत इत्यादींवर गुणकारी आहे.
केळीचे आरोग्यदायी फायदे : दोन केळी खाल्ल्याने शरीराला पुढील ९० मिनिटांपर्यंत उर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते. अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावीत. ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे. केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. परीक्षा देण्यासाठी जात असाल तर जरुर केळे खावीत. जुलाबाचा त्रास होत असल्यास केळे खाणे उत्तम. केळ्याच्या नियमित सेवनाने चयापचयाची क्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यास मदत होते. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळे करते. अधिक मद्यपान केल्याने हँगओव्हर झाल्यास केळ्याचा शेक प्यायल्याने लवकर आराम मिळतो.
जाती : बसराई, श्रीमंती, वेलची, सोनकेळी, लालकेळी, चक्रकेळी, कुन्नन, अमृतसागर, बोंथा, विरुपाक्षी, हरिसाल, सफेद वेलची, लाल वेलची, वामन केळी, ग्रोमिशेल, पिंसांग लिलीन, जायंद गव्हर्नर, कॅव्हेन्डीशी, ग्रॅन्ड नैन, राजापुरी, बनकेळ, भुरकेळ, मधेली, राजेळी आदी.
केळीपासून तयार करता येतात, हे स्वादिष्ट पदार्थ
चिप्स : पूर्ण वाढ झालेली १० टक्के परिपक अशी केळी निवडावीत. ही केळी स्वच्छ पाण्याने धुऊन किंवा ओल्या स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावीत. स्टीलच्या चाकूने फळांची साल काढावी. केळी सोलण्याचे मशीन विकसित करण्यात आले आहे. या मशीनची ताशी ४५० (८० टक्के परिपक्र असलेली) केळी एका दिवसात सोलण्याची क्षमता आहे. मशीनच्या सहाय्याने ०.३ ते ०.५ मि.मी. जाडीच्या चकत्या कापान्यात. मशीन उपलब्ध नसल्यास स्टीलच्या चाकूने गोल, पातळ काप करावेत. साध्या चाकूने काप केल्यास ते काळे पडतात. काप काळसर पडून नयेत व ते पांढरेशुभ्र होण्यासाठी ०.१ टका सायट्रिक अॅसिड किंवा पोटेंशियम मेटबाय सल्फाइडच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुड़नून ठेवावेत. नंतर चकत्या उकळत्या पाण्थात ४ ते ५ मिनिटे थंड करून प्रतिकिलो चकत्यास ४ ग्रॅम या प्रमाणात गंधक घेऊन त्याची धुरी द्याची. या चकत्या उन्हात किंवा ड्रायरमध्ये सुकवाव्यात. जर ड्रायरमध्ये चकत्या सुकवायच्या असतील, तर ड्रायरमधील तापमान ५० ते ५५ अंश एवढे ठेवावे. चकत्या ह्याताने दाबल्या असता मोडल्यास त्या तयार झाल्या आहेत, असे समजाचे व सुकविण्याचे काम थांबवावे. विक्रीसाठी केळीला जास्त दिवस टिकविण्यासाठी हे वेफर्स हाथ डेन्सिटी पॉलिथीन पिशव्यात घालून हवाबंद डब्यात साठवाव्यात.
जॅम : कोणत्याही जातीच्या पूर्ण पिकलेल्या केळीचा वापर जॅम तयार करण्यासाठी करता येतो. गराच्या वजनाएवढी साखर मिसळून गर मंद अग्रीवर शिजवावा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर ०.५ टक्के पेक्टीन, ०.३ टक्के सायट्रेिक आम्ल व रंग टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स ६८ ते ७0 डिग्री झाल्यावर जॅम तयार झाला, असे समजावे. तयार जॅम कोरड्या व निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावा. ह्या पदार्थ एक वर्षापर्यंत टिकू शकतो.
ज्यूस : या प्रक्रियेत पूर्ण पक्र केळ्याचा पल्पर मशीनचे गर काढतात. गर घट्ट असल्याने सर्वसाधारण स्वरुपात रस काढता येत नाही. त्याकरिता पाच मि.लि. प्रतिकिलो या प्रमाणात पेक्टीनेज एन्झाइम मिसळून दोन तास ठेवल्यानंतर स्वच्छ रस सहज मिळतो. या रसाची गोडी २४ ते २६ डिग्री ब्रिक्स असते. या रसात दीड पट पाणी मिसळून, आवश्यकतेनुसार सायट्रिक आम्ल टाकून आरटीएस बनविता येते. त्याची गोडी १५ डिग्री ब्रिक्स व आम्लता o.३ टक्के असते. हे पेय ८५ अंश से. तापमानाला पाश्चराइज्ड करून निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावे. हा पदार्थ सहा महिन्यांपर्यंत टिकू शकतो. केळीपासून ८८ टक्के रसाचे प्रमाण मिळते.
जेली : ५० टक्के पक्र फळाचा गर पाण्यात एकजीव करून १५ ते २0 मिनिटे गरम करावा. गरगाळून घ्यावा. गाळलेल्या गरात समप्रमाणात साखर, ०.५ टक्के सायट्रेक आम्ल व पेक्टीन टाकून उकळी येईपर्यंत शिजवावे. या वेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे १०४ अंश से.असते. तयार जेलीमध्ये एकूण घन पदार्थाचे प्रमाण ७० डिग्री ब्रिक्स इतके असते. जेली गरम असतानाच निर्जतुक बाटल्यांमध्ये भरावी. पेरूच्या जेलीपेक्षा केळीची जेली पारदर्शक व स्वादिष्ट असते.
भुकटी : केळीच्या भुकटीला परदेशात भरपूर मागणी आहे. यापासून आपणास परकीय चलनही मिळू शकते. यासाठी पूर्ण पिकलेली केळी वापरतात. प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतात. केळीची साल काढून पल्पर यंत्राच्या सहाय्याने लगदा करून घेतात. केळीच्या गराच्या लगद्याची भुकटी स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायर किंचा फोम मेंट ड्रायरच्या सहाय्याने करतात. तयार झालेली भुकटी निर्जतुक हवाबंद डब्यात साठवून कोरड्या व थंड जागी साठवितात. त्याचा वापर लहान मुलांच्या आहारात केला जातो. बिस्किटे व बेकरीमध्ये तसेच आइस्क्रोममध्ये केळीच्या भुकटीचा वापर केला जातो.
शुभदा पलघडमल, श्रीकृष्ण घाटूळ, उदय पाटील सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, सोनई. (मोबा. ९६५७६३८०२६)
शेतीमित्र मासिक आता.. शेतकर्यांच्या मोबाईलवर ! शेतीविषयक आधुनिक माहिती वेळोवेळी मिळविण्यासाठी शेतीमित्र मासिकाचे फेसबुक पेज लाईक करा !