Farmers loan waiver : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे. या निर्णयाचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून स्वागत केले असून, महाराष्ट्रातील बीआरएस पक्षाच्या (BRS Party) कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारची कर्जमाफी महाराष्ट्रातही करावी, अशी मागणी केली आहे.
ब्रेकिंग : राज्यातील शेतकऱ्यांकडून पीक विम्यासाठी 1 कोटी 69 लाख अर्ज दाखल
चार दिवसांपूर्वी तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांची 19 हजार कोटींची (loan waiver) कर्जमाफी जाहीर केली आहे. या निर्णयाचे स्वागत करीत महाराष्ट्रातील बीआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी ठिकठिकाणी पेढे वाटून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 3 ऑगस्टपासून शेतकरी कर्जमाफी कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना आधीच देण्यात आलेल्या कर्जमाफीसोबतच आणखी 19 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम महिन्याच्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री केसीआर यांनी दिले आहेत.
त्याचे जोरदार पडसात महाराष्ट्रात (Maharashtra) उमटले असून, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड जिल्ह्यात बीआरएस पक्षातील कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. तेलंगणा राज्यातील सरकार हे करु शकते तर महाराष्ट्र सरकार (Govt) हे का नाही करु शकत ? ही भूमिका मांडून जोरदार घोषणाबाजीही केली.
मोठी घोषणा : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना मिळणार 25 लाख रूपये
https://www.facebook.com/shetimitramagazine03