डाळींबावरील विविध समस्येपैकी तेलकट डाग रोग (बॅक्टेरियल ब्लाईट) ही एक मोठी समस्या आहे. महाराष्ट्रात कर्नाटक राज्यातून 2000 साली रूबी जातीची तेलकट डाग रोगग्रस्त कलमे आणली गेली आणि तेव्हापासून या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातील डाळींब बागांवर सुरू आहे. सध्या राज्यातील सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक भागात डाळींबावर या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. हा जिवाणूजान्य रोग पाने, फुले फांद्या, खोड आणि फळांवर होती. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक रोग नियंत्रण पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे.
फायद्याची गोष्ट : डाळिंबावरील कीड व्यवस्थापन
रोगाची ओळख : डाळिंबावरील बॅक्टेरियल ब्लाईट रोग (तेल्या) हा प्रामुख्याने जिवाणूजन्य असून झॅन्थोमोनास अक्झानोपोडीस पिव्ही पुनीकीया जिवाणूमुळे होतो. 1959 साली सखोल संशोधनाअंती हा रोग 'झान्थोमोनास पुनिकी' या अणुजीवामुळे होत असल्याचे डॉ. हिंगोरानी आणि सिंग यांनी सिद्ध केले आहे.

रोगाची लक्षणे :
1. तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव पाने फुले खोड आणि फळांवर होतो.
2. सुरुवातीस पानावर लहान तेलकट किंवा पानथळ डाग दिसतात.
3. उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात.
4. फुलांवर व कळ्यांवर गर्द तपकिरी व काळपट डाग पडतात.
5. पुढे यामुळे फुलांची व कळ्यांची गळ होते.
6. खोडावर व फांद्यांवर सुरुवातीला काळपट किंवा तेलकट डाग गोलाकार दिसतात.
7. फळावर सुरुवातीला एकदम लहान आकाराचे पानथळ तेलकट डाग दिसतात.
8. कालांतराने हे डाग तपकिरी काळपट दिसतात व त्यावर भेगा पडतात.
9. फळांवर या डागांमुळे आडवे उभे तडे जातात.
10. तडे मोठे झाल्यावर फळे इतर कारणाने सडतात आणि गळून पडतात.
महत्त्वाची माहिती : डाळिंबासाठी संरक्षित पाणी असल्यास आंबे बहार फायद्याचा
रोगास अनुकूल बाबी:
11. जीवाणूंची वाढ 28 ते 32 अंश सेल्सिअस तापमान तसेच वातावरणातील आर्द्रता 80 % पेक्षा जास्त असल्यास झपाट्याने होते.
12. बागेत किंवा बागेशेजारी तेलकट डाग रोगाचे अवशेष असणे.
13. ढगाळ व पावसाळी हवामान, वादळी पाऊस आणि वातावरणातील आर्द्रता जास्त असणे.
14. फळ हिरव्या रंगांच्या अवस्थेत असताना लवकर प्रादुर्भाव होतो
महत्त्वाचे : का आहे सोलापूर लाल डाळींब नंबर 1
एकात्मिक रोग नियंत्रण :
1. बहार धरताना जमिनीवरील रोगट जिवाणूंची संख्या कमी करण्यासाठी ब्लिचिंग पावडर झाडाखाली भुकटी हेक्टरी 20 किलो धुरळावी.
2. झाडाच्या फांद्या प्रादुर्भाव झालेल्या भागाच्या 2 इंच खालुन छाटाव्यात.
3. छाटणी करताना कात्री प्रत्येकवेळी 1 % डेटोलच्या द्रावणात निर्जंतुक करुन घ्यावी.
4. पानगळ व छाटणीनंतर बक्टेरियानाशक (500 पीपीएम)/ बोर्डोमिश्रण (1 %) यांची फवारणी करावी.
5. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास खालील 4 फवारण्या 5 दिवसांच्या अंतराने कराव्यात.
A) पहिली फवारणी : कॉपरहायड्रॉक्साईड 2 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 0.3 ग्रॅम + ब्रोनोपॉल 0.5 ग्रॅम + सर्फेक्टंट 0.5 मि.लि / लिटर.
B) दुसरी फवारणी : कार्बेन्डाझिय 1 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 0.3 ग्रॅम + ब्रोनोपॉल 0.5 ग्रॅम + सर्फेक्टंट 0.5 मि.लि / लिटर.
C) तिसरी फवारणी : कॉपर ऑक्झिक्लोराईड 2.5 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 0.3 ग्रॅम + ब्रोनोपॉल 0.5 ग्रॅम + सर्फेक्टंट 0.5 मि.लि/लिटर.
D) चैाथी फवारणी : मँकोझेब (75 %) 2 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 0.3 ग्रॅम + ब्रोनोपॉल 0.5 ग्रॅम + सर्फेक्टंट 0.5 मि. लि / लिटर.
(टीप - सदर औषधांची फवारणी फळ काढणीच्या 30 दिवसापुर्वी बंद करावी. पावसाळी हंगामात ही फवारणी फळ काढणीच्या 20 दिवसापुर्वी बंद करावी.)

भोसले गणेश हनुमंत, सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, लोकमंगल कृषि महाविद्यालय, वडाळा (Mo. 9096545813)
महत्त्वाच्या टिप्स : डाळिंबाच्या फुलसमस्येवर हे आहेत सेंद्रिय उपाय

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1