परभणी कृषी विद्यापीठात अधिकृत कृषी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि गुरुग्राम (हरियाना) येथील आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेड यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
हे नक्की वाचा : भारत हा जगात सर्वात जास्त फळ उत्पादन करणारा देश : शरद पवार
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात अधिकृत कृषी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि गुरुग्राम (हरियाना) येथील आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेड यांच्यात मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला.
कुलगुरू डॉ. इंद्र मणी आणि आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेडचे संचालक अनुपकुमार उपाध्याय तसेच विद्यापीठामार्फत डॉ. उदय खोडके आणि डॉ. विशाल इंगळे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रिक दीपाराणी देवतराज, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, ‘नाहेप’ प्रकल्प मुख्य संशोधक डॉ. गोपाल शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रवीण कापसे, डॉ. विशाल इंगळे, डॉ. दत्ता पाटील आदी उपस्थिती होती.
मोठी बातमी : उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलले हिंगोलीतील शेतकऱ्याची पोलिसात तक्रार
कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापरासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या नियमानुसार अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेकडून परवाना घ्यावा लागतो. त्यासाठीच्या या करारामुळे पीकनिहाय ड्रोन वापराच्या संशोधनास चालना मिळणार आहे. ड्रोनद्वारे शास्त्रशुद्ध पद्धतीने फवारणी करणे, फवारणी करिता विविध प्रकाराचे नोझल तयार करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य गतीने आणि काटेकोरपणे फवारणी करणे, या बाबत प्रशिक्षण व संशोधन कार्यास चालना मिळणार आहे.
कुलगुरू डॉ. इंद्र मणी हे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय समितीने नुकतेच नऊ पिकांमध्ये ड्रोनचा सुरक्षित, कार्यक्षम वापराबाबतची मार्गदर्शक तत्त्वे केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागास सादर केले आहेत. मृदा आणि पीक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याकरिता डॉ. इंद्र मणी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे.
ब्रेकिंग न्यूज : कोल्हापूर सांगलीला अलमट्टीचा वाढता धोका ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1