• आमच्या विषयी
    • दोन शब्द
    • पुरस्कार
    • संपर्क
    • जाहिरात
Saturday, June 7, 2025
  • Login
Shetimitra
Advertisement
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र
No Result
View All Result
Shetimitra
No Result
View All Result

एसटीचे विलिनीकरण शक्य नाही त्रिसदस्यीय समितीची शिफारस

शेतीमित्र by शेतीमित्र
March 5, 2022
in शेतीच्या बातम्या
0
एसटीचे विलिनीकरण शक्य नाही त्रिसदस्यीय समितीची शिफारस
0
SHARES
0
VIEWS

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नाही,असे राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने शिफारस केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी आज दिली. त्यामुळे संपकाळात ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई किंवा बडतर्फीची नोटीस बजावली आहे ती मागे घेण्यात येईल, असे सांगतानाच कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता सर्व संपकरी कामगारांनी १० मार्च २०२२ पर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी श्री.परब यांनी केले.
तसेच जे कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत, त्यांनी अपील करावे आणि ज्यांचा अपिल करण्याचा कालावधी संपलेला असेल अशा कामगांराना १५ दिवसांची मुदतवाढ वाढवून देण्यात येईल, असेही ॲड.परब यांनी स्पष्ट केले.


राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या ४ महिन्यांहून अधिककाळ बेमुदत संपावर आहेत. संपाच्या मुद्यावर माननीय मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. माननीय न्यायालयाने एसटीच्या विलिनीकरणाच्या निर्णयासंदर्भात राज्य सरकारला त्रीसदस्यीय समिती नेमण्याचे निर्देश दिले होते. राज्य सरकारने नेमलेल्या समितीने नुकताच आपला अहवाल न्यायालयात सादर केला होता. सदर अहवाल मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल सादर केला. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी अॅड. परब बोलत होते.


या अहवालामध्ये एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनकरण करावे ही एसटी कामगारांची मागणी त्रीसदस्यीय समितीने अमान्य केलेली आहे. त्यासाठी समितीने प्रशासकीय, आर्थिक आणि कायदेशिरबाबींवर सखोल अभ्यास करुन त्यांनी आपल मत हे माननीय उच्च न्यायालयाला कळविलेले आहे. या सर्व तिन्ही बाबींवर महामंडळात एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण होणार नाही हे स्पष्टपणे नमुद केले असल्याचे श्री. परब यांनी सांगितले.
विलिनीकरणामुळे पगाराचा प्रश्न सुटेल, पगार वेळेत होईल, असे प्रश्न कामगारांच्या मनात होते. परंतु, राज्य सरकारने हा संप चालू असतानाच ज्यांची एसटीत १ ते १० वर्षांपर्यंत सेवा झाली आहे त्यांच्या मुळ पगारात ५ हजार रूपये तर ज्यांची १० ते २० वर्षे सेवा झाली आहे त्यांच्या मुळ पगारात ४ हजार रूपये तसेच जे कामगार २० वर्षाहून अधिककाळ सेवेत आहेत, अशा कामगारांच्या मुळ पगारात २५०० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच ही वाढ करून कामगारांचे पगार १० तारखेच्या आत होतील याची हमी राज्य सरकारने घेतील आहे.


विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर जाण्याऐवजी आपण कामावर या… अशी विनंती केली होती. एसटी बंद करून किंवा एसटीचं नुकसान करून आपल्या मागण्या पदरात पाडून हे कोणालाही परवडणारे नाही. कारण एसटी ही सर्व सामान्यांची, ग्रामीण जनतेची गरज आहे. ग्रामीण भागांतून तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज, शाळेमधील मुलं, जेष्ठ नागरीक एसटीचा वापर करीत असतात. एसटी ही गरिब माणसाची जीवनवाहिनी आहे, ती तुम्ही बंद करू नका असे वारंवार आवाहन सरकारने केले आहे.या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी २८ हजारांहून अधिक कामगार कर्तव्यावर रूजू झाले असून अजूनही बऱ्याच मोठया प्रमाणात कर्मचारी कामावर आलेले नाहीत, असे सांगतानाच जे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, परंतु ज्यांच्यावर कारवाई झालेली नाही, अशा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर यावे. तसेच ज्या कामगारांवर निलंबनाची कारवाई आणि बडतर्फीची नोटीस दिली गेली आहे, त्या कामगारांवरील निलंबनाची कारवाई आणि बडतर्फीची नोटीस मागे घेतली जाईल. तसेच ज्यांना बडतर्फ केले आहे त्यांनी देखील अपील करावे. त्यांचे अपिल कायदेशिर प्रक्रियेअंती निकाली काढण्यात येईल, असेही श्री.परब यांनी यावेळी सांगितले.


https://www.facebook.com/shetimitramagazine03/

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास हा लेख आवडला असल्यासखालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Tags: Appeal to suspended and fired employees to come to workReport presented by Transport Minister Anil ParabST workers strike continues for 4 monthsएसटी कर्मचाऱ्यांचा ४ महिन्यापासून संप सुरूचनिलंबित व बडतर्फ कर्मचाऱ्यांनी कामावर येण्याचे आवाहनपरिवहन मंत्री अनिल परब यांनी सादर केला अहवाल
Previous Post

राष्ट्रीय आपत्तीनिधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर

Next Post

कापसावरील लाल्याचे असे करा नियंत्रण

Related Posts

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?
शेतीच्या बातम्या

राज्यात गुरुवारपासून पाऊस ?

November 11, 2024
मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले
शेतीच्या बातम्या

मुंबईत कांदा, लसणाचा तुटवडा : दरवाढले

November 11, 2024
मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा
शेतीच्या बातम्या

मोठी बातमी ! शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार : शरद पवारांची घोषणा

November 7, 2024
Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार
शेतीच्या बातम्या

Guaranteed Price : कमी दराने सोयाबीन, कापूस खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा : अब्दुल सत्तार

October 26, 2023
Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन
शेतीच्या बातम्या

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

October 26, 2023
डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात
शेतीच्या बातम्या

डॉ. प्रवीण गेडाम नवे कृषी आयुक्त : कामाला धडाकेबाज सुरुवात

October 21, 2023
Next Post
कापसावरील लाल्याचे असे करा नियंत्रण

कापसावरील लाल्याचे असे करा नियंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Live Counter

Our Visitor

230544
Users Today : 18
Users Last 30 days : 1301
Users This Month : 143
Users This Year : 4874
Total Users : 230544
Powered By WPS Visitor Counter
  • मुख्य पान
  • सेंद्रिय शेती
  • पशुपालन
  • शेतीपुरग उद्योन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • मुख्य पान
    • नगदी पिके
    • तृणधान्ये
    • तेलबीया
    • कडधान्ये
    • फळबागा
    • भाजीपाला
    • फुलशेती
    • वनपिके
    • औषधी वनस्पती
    • किड-रोग व तणे
  • सेंद्रिय शेती
    • माती परिक्षण
    • गांडुळ शेती
    • कंपोस्ट खते
  • पशुपालन
    • गाय पालन
    • म्हैस पालन
    • दुग्ध व्यवसाय
    • शेळी पालन
    • कोंबडी पालन
    • मत्स्यपालन
    • चारा पिके
  • शेतीपुरग उद्योन
    • रेशीम शेती
    • कृषी प्रक्रीया
    • मशरुम शेती
    • बिजोत्पादन
    • नर्सरी उद्योग
    • कृषी पर्यटन
  • यशोकथा
  • शेतीची पुस्तके
    • शेतीचे कायदे
    • शेतीची पुस्तके
    • शासकीय योजना
  • शेतीच्या बातम्या
  • नवे तंत्रज्ञान
  • ई-शेतीमित्र

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
× Chat With Us