दुधाचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याने दुग्ध उत्पाद्क शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. असे असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत आता 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 7 रुपयांनी महागणार आहे.
हे नक्की वाचा : शेतकरी आत्महत्येचा मुद्दा मला अस्वस्थ करतो : शरद पवार
दरम्यान, सोलापूरच्या दूध पंढरीनेही खरेदी दर वाढविला आहे. दुग्ध उत्पाद्क शेतकऱ्यांना सध्या काही प्रमाणात हा व्यवसाय फायद्याचा ठरू लागला आहे. त्यामुळे त्यांना दुग्ध व्यवसायातून चार पैसे मिळू लागले आहेत. होणाऱ्या दर वाढीमुळे आता सुट्टे दूध एक लिटर दुधासाठी ग्राहकांना 80 रुपये मोजावे लागणार आहेत. दूध ग्राहकांना याची झळ बसत असली तरी दुग्ध उत्पाद्क शेतकऱ्यांना याचा काही प्रमाणात फायदा होणार आहे.

दरम्यान, जनावरांना लागणाऱ्या पशुखाद्य व चाऱ्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे, त्याचे दर दुप्पट झाले आहेत. तूर, हरभऱ्याच्या किमती 15 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे दूध दरात वाढ केल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकरी याबाबत अनेक दिवसांपासून मागणी करत होते.
आनंदाची बातमी : आजपासून ‘या’ जिल्ह्यात पाऊस : पंजाबराव डख यांचा अंदाज
दरम्यान, सुटे दूध 7 रुपयांनी महागणार आहे. हे दर फक्त मुंबई पुरते वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात दुधाचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे. अनेक संघांनी हे दर वाढवल्याचे दिसून येत आहे.
हे नक्की वाचा : कृषी संशोधन शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावे : गडकरी

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1